Influencer Arrested Saam tv
मनोरंजन बातम्या

Influencer Arrested: व्ह्यूजसाठी प्रसिद्ध युट्यूबरचं महिलांसोबत धक्कादायक कृत्य; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा

Influencer Arrested: महिला आणि अल्पवयीन मुलींना मुद्दाम धडक देऊन त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या 'रोड सेफ्टी वाला' युट्युबरला पोलिसांनी अटक केली आहे.

Shruti Vilas Kadam

Influencer Arrested: सोशल मीडियावर व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही जण कोणत्याही थराला जात असल्याचे अनेकदा समोर येते. अशीच एक धक्कादायक घटना आता दिल्लीत उघडकीस आली आहे. 'रोड सेफ्टी वाला' नावाचे सोशल मीडिया चॅनेल चालवणारा युट्युबर गुरमन सिंग याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या स्कूटर व दुचाकींना मुद्दाम धडक देऊन त्यांचे व्हिडिओ तयार करणे आणि ते सोशल मीडियावर अपलोड करणे, असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी दिल्ली पोलिसांकडे एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने सांगितले की, त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या स्कूटरला दोन अनोळखी व्यक्तींनी मागून धडक दिली. त्यानंतर त्या मुलीचा पाठलाग करत तिच्यावर अश्लील कमेंट केली. काही दिवसांनी संबंधित मुलीचा व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकवर अपलोड झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी केली. त्यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींना टार्गेट करून अनेक व्हिडिओ तयार केल्याचे लक्षात आले. तांत्रिक पुरावे आणि डिजिटल तपासाच्या आधारे पोलिसांनी ३२ वर्षीय गुरमन सिंग याला अटक केली.

चौकशीदरम्यान आरोपीने धक्कादायक कबुली दिली. सोशल मीडियावर अधिक फॉलोअर्स, व्ह्यूज आणि आर्थिक कमाई मिळवण्यासाठी तो मुद्दाम महिलांना टार्गेट करत असल्याचे त्याने मान्य केले. रस्त्यावर एकट्या जाणाऱ्या महिला, मागे बसलेल्या महिला प्रवासी आणि अल्पवयीन मुलींच्या गाड्यांना तो जाणीवपूर्वक धडक द्यायचा.

विशेष म्हणजे, धडक दिल्यानंतर संशय येऊ नये म्हणून तो लगेच 'सॉरी दीदी' असे म्हणत माफी मागायचा. दरम्यान, त्याचा साथीदार संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचा. संबंधित महिलांची किंवा मुलींची कोणतीही परवानगी न घेता हे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जात होते. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ शूटिंगसाठी वापरण्यात आलेले कॅमेरे आणि इतर साहित्यही जप्त केले आहे. आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पात्र ITI विद्यार्थ्यांना SSC आणि HSSC समकक्ष मान्यता; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

MSRTC अखेर दरवाढ केलीच! मध्यरात्रीपासून नवे दर लागू; किती असेल मुंबई-पुण्यासाठी तिकीट

खोत डोंगरी पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला; न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवला, ऑफिस कंटेनर हटवला

सलमान खानचा SRA मध्ये जलवा! झोपडपट्टीधारकांना मिळालं हक्काचं घर

जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार? फडणवीस-शिंदेंसोबत जयंत पाटलांची बैठक

SCROLL FOR NEXT