Janhvi Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांवरील याचिकेवर दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश. अश्लील सामग्री हटवण्याचे निर्देश, मात्र फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार.

Shruti Vilas Kadam

Janhvi Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या नावाचा, फोटोचा आणि ओळखीचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. इंटरनेटवर जान्हवीशी संबंधित अश्लील आणि अत्यंत आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि मिम्स तातडीने हटवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, अभिनेत्रीच्या परवानगीशिवाय चालवली जाणारी सर्व फॅन पेजेस किंवा इतर ऑनलाइन कंटेन्ट सरसकट ब्लॉक करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

जान्हवी कपूरने आपल्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिचे फोटो आणि ओळख व्यावसायिक फायद्यासाठी वापरणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससह ५,००० हून अधिक वेबपेजेस आणि पोस्ट्सवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

न्यायालयाने अश्लील किंवा अत्यंत आक्षेपार्ह कंटेन्टपासून संरक्षण मिळण्याचा जान्हवीचा अधिकार मान्य केला. मात्र, तातडीने कोणत्या कंटेन्टवर कारवाई करायची, याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे अश्लील किंवा अत्यंत आक्षेपार्ह कंटेन्ट असलेल्या वेबपेजेसची अचूक यादी तयार करण्याचे निर्देश अभिनेत्रीच्या वकिलांना देण्यात आले.

फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

जान्हवीच्या नावाने चालणारी सर्व फॅन पेजेस हटवण्याची मागणी मात्र न्यायालयाने मान्य केली नाही. फॅन पेजेसवर कलाकाराचे कौतुक, टीका किंवा थट्टा केली जाऊ शकते आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

“आम्ही देशाचे नैतिक रक्षक नाही,” असे निरीक्षण न्यायमूर्ती भंभानी यांनी नोंदवले. सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असल्याने एखाद्या व्यक्तीवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येक फॅन क्लब किंवा फॅन पेज बंद करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

SCROLL FOR NEXT