Aaradhya Bachchan File Complaint In HC Instagram @aishwaryaraibachchan_arb
मनोरंजन बातम्या

Aaradhya Bachchan Delhi HC Case: आराध्याच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने दिला निर्णय...

Fake News About Aaradhya Bachchan: काही युट्यूब चॅनलनी आराध्या बच्चनच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवल्या होत्या.

Pooja Dange

Aaradhya Bachchan Moves Delhi HC against YouTube Tabloid: अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची लेक आराध्या सध्या चर्चेत आहे. आराध्याने दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आहे. हायकोर्टाने आराध्याशी संबंधित कंटेन्ट बंदी घातली आहे. त्वरित तसेच हायकोर्टाने अनेकांना समन्स देखील पाठविले आहे.

आराध्याने तिच्या वडील अभिषेक बच्चन मार्फत ही याचिका दाखल केली होती. आराध्याने सांगितले की, या वादग्रस्त व्हिडिओंमध्ये ती गंभीरपणे आजारी असल्याचे दाखवले जात आहे.

इतकंच नाही तर अभिषेक देखील आता या जगात नसल्याचा दावाही अनेक ठिकाणी केला जात होता. अशा प्रकारचा कंटेन्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तत्काळ हटवून तो तत्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

काही यूट्यूब चॅनलनी आराध्या बच्चनच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवल्या होत्या. हे पाहून संपूर्ण कुटुंब संतापले होते. एवढेच नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. बच्चन कुटुंबीयांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

ऐश्वर्या-अभिषेक बच्चनची १२ वर्षांची मुलगी याआधीही अनेकदा ट्रोल झाली होती आणि तिच्या वडिलांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. मुलीच्या विरोधात अशा अश्लील गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही, असे अभिषेकने सांगितले होते.

अभिषेक म्हणाला की, 'मी पब्लिक फिगर आहे पण माझी मुलगी नाही. अशा परिस्थितीत आराध्याबद्दल कोणी काही बोलले तर मी शांत बसणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; ६५ जण जखमी

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

Gokul Election: 'गोकुळ'चं राजकारण तापलं, भाजप अन् महाडिक गटाला डावलणं सत्ताधाऱ्यांच्या अंगलट?

SCROLL FOR NEXT