Deepika Padukone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिका पादुकोण 'या' दिवशी देणार बाळाला जन्म, डिलिव्हरी डेट आली समोर

Deepika Padukone Delivery Date: बॉलिवूडचं लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण- रणवीर सिंह लवकरच आई- बाबा होणार आहेत. नुकतंच दीपिकाच्या डिलिव्हरीची तारीख समोर आली आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडचं लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण- रणवीर सिंह लवकरच आई- बाबा होणार आहेत. लग्नाच्या ६ वर्षानंतर हे कपल आई- बाबा होणार आहेत. यामुळे दीपिका आणि रणवीर बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर दीपिकाच्या प्रेग्नेसीविषयीच्या नवनवीन अपडेट येत असतात.

अभिनेत्री दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली होती. दीपिकाने सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देईल असं सागितलं होतं. यामुळेच आता दीपिका- रणवीरचे चाहतेही त्यांच्या बाळाविषयी उत्सुकतेत आहेत.

अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रेग्नेंट असल्यानंतरही तिच्या 'कल्की 2898' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान उपस्थित होती. दरम्यान सध्या दीपिकाने तिच्या कामातून ब्रेक घेतला असून दीपिका प्रेग्नेसींचा वेळ एन्जॉय करत आहे. मिळालेल्या महितीनुसार, येत्या 28 सप्टेंबरला दीपिका बाळाला जन्म देणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दीपिका बाळाला जन्म देणार असल्याचं बोललं जातय.

अलिकडेच दीपिका- रणवीर बाळाचं स्वागत नवीन घरात करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. बाळाला जन्म दिल्यानंतर दीपिका मुंबईतील आलिशान घरात शिफ्ट होणार असल्याचं बोललं जातय. दोन वर्षापूर्वी दीपिका-रणवीरने शाहरूख खानच्या 'मन्नत' शेजारी 119 कोटींचा अलिशान फ्लॅट खरेदी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World's Most Expensive Car : जगातील सर्वात महाग कार कोणती, जाणून घ्या

Romantic Places In Kalyan: पार्टनरसोबत डेटवर जायचा प्लान करताय? कल्याणमधील 4 रोमॅन्टिक ठिकाणे, आनंद होईल द्विगुणित

Satara News : डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती, मृत्यूचं खरं कारण समोर, शेवटचा कॉल कोणाला केला?

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ८व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

Maharashtra Live News Update: जळगावमध्ये भरधाव बस टोलनाक्याच्या भिंतीवर धडकली, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT