Deepika-Ranveer Baby Net Worth SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika-Ranveer Baby Net Worth : दीपवीरची चिमुकली झाली 745 कोटींची मालकीण, कसं ते पाहा

Deepika Padukone and Ranveer Singh Net Worth : नुकतेच दीपिका-रणवीर आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आता ही चिमुकली 745 कोटींची मालकीण झाली आहे. कसं? जाणून घ्या.

Shreya Maskar

दीपिका-रणवीर बॉलिवूडचं पावर कपल आहे. 8 सप्टेंबरला त्यांना कन्यारत्न लाभले आहे. एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दीपिकाने मुलीला जन्म दिला. दीपिका आणि रणवीर दोघांचेही कोट्यवधींची नेटवर्थ आहे. ती दोघही लक्झरी आयुष्य जगताना दिसतात. आता हेच आयुष्य ते आपल्या मुलीला देणार आहेत. त्यांच्याकडे अनेक फ्लॅट्स, आलिशान गाड्या आहेत. त्यांच्या कोटीच्या संपत्तीला काल वारिस भेटला आहे. दीपिकाचा स्वतःचा एक ब्रँड देखील आहे. दोघेही स्टार इंडस्ट्रीत पैसे कमावत आहेत. त्यांनी चित्रपट, जाहिराती करून कोट्यवधींची संपत्ती कमवली आहे. त्या दोघांची मिळून जवळजवळ 745 कोटी रुपयांचे नेटवर्थ आहे.

दीपिकाची संपत्ती किती?

दीपिकाही (Deepika Padukone) बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. दीपिका चित्रपटांसोबतच अनेक जाहिरातीमध्ये देखील झळकते. दीपिका अनेक ब्रँड्ससोबत कनेक्ट आहे. तसेच दीपिकाचा 82E करून स्वतःचा सेल्फ केअर ब्रँड आहे. हा ब्रँड महिलांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच दीपिकाने अनेक स्टार्टअप व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये लेव्हीज, डायसन, एशियन पेंट्स, जिओ यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाची एका महिन्याची कमाई तीन कोटींपेक्षा जास्त आहे. ती कायम सौंदर्य आणि फॅशनमध्ये गुंतवणूक करताना दिसते. बॉलिवूडची मस्तानी एकूण 500 कोटी रुपयांची मालकीण आहे.

रणवीरची संपत्ती किती?

बॉलिवूडच्या बाजीराव देखील कोटी रुपयांचा मालक आहे. त्यांनी आपल्या तुफानी अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मन मोकळ्या स्वभावाचा रणवीर आपल्या भन्नाट फॅशनमुळे नेहमी चर्चेत असतो. रणवीरने आपल्या करिअरची सुरूवात 14 वर्षांपूर्वी केली आहे. रणवीरने (Ranveer Singh) अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे.चित्रपटात येण्याआधी रणवीरने असिस्टेंड डायरेक्टर आणि कटेंट रॉयटर म्हणून काम केले आहे. रणवीरने हजार रुपयांपासून आपल्या करिअरला सुरूवात केली होती आणि आता तो 245 कोटींचा मालक आहे. रणवीर एका चित्रपटासाठी कोट्यावधीचे मानधन घेतो. रणवीर देखील जाहिरातीमधून पैसे कमावतो. रणवीर पेप्सी, चिंग्स, मान्यवर, बिंगो या ब्रँडसोबत कनेक्ट आहे. दीपिका-रणवीरची एकूण संपत्ती (Net Worth) मिळवून त्यांची चिमुकली 745 कोटीची मालकीण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT