Deepika Padukone Prabhas Movie: साऊथ स्टार प्रभासच्या एका चित्रपटाची सध्या चर्चा आहे. 'प्रोजेक्ट के' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा अद्याप झालेली नाही. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने १७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रभासचा हा चित्रपट सायन्स फिक्शनवर आधारित आहे.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचे निजाम राईट्स ७० करोड विकले गेले आहेत. सुनील नारंग यांनी हे राईट विकत घेतले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे आंध्रप्रदेशातील राईट्स १०० करोडला विकण्यात आले आहेत. टॉलिवूडमध्ये या चित्रपटाने १७० करोडची कमाई केली आहे.
'प्रोजेक्ट के' चित्रपटाचा ५० टक्के रेव्हेन्यू राईट्स विकूनच मिळवला आहे. अजून या चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशन राईट्सची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रदर्शननंतर होणारे बॉक्स ऑफिस कलेक्शन अजून लांबच आहे.
प्रभास आणि त्याच्या टीमने चित्रपटाचे ८० टक्के काम पूर्ण केले आहे. राहिलेले २० टक्के काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनसाठी खूप वेळ लागणार आहे.
'प्रोजेक्ट के' हा चित्रपट २०२४मध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे एकूण बजेट ५०० करोड आहे. प्रभासचे 'राधे श्याम आणि 'साहो' हे चित्रपट देखील बिग बजेट होते परंतु त्यांना बॉक्स ऑफिस हवे तसे यश मिळाले नाही. 'प्रोजेक्ट के' चित्रपटाकडून सर्वांना खूप अपेक्षा आहेत.
तेलगू चित्रपटसृष्टीला 'निजाम राईट्स' असे म्हटले जाते. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याची चर्चा तेलगू इंडस्ट्रीमध्ये होतेच. चित्रपटाची जास्तीत जास्त कमाई व्हावी यासाठी सर्वांचे लक्ष या इंडस्ट्रीवर असते. ही इंडस्ट्री चित्रपटाचे राईट्स खरेदी करून सर्वात जास्त रेव्हेन्यू प्राप्त करते.
'प्रोजेक्ट के'ला जर बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आले नाही तर प्रभासवर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येईल. 'आदिपुरुष' चित्रपटामुळे प्रभास खूप ट्रॉल करण्यात आले आहे.
प्रभासचा 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचे दिग्दर्शन नागा अश्विन करत आहेत. तर या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, पावन कल्याणसह अनेक स्टार कलाकारांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.