Gulabbai Sangamnerkar
Gulabbai Sangamnerkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर (Gulabbai Sangamnerkar) यांचे पुण्यातील (Pune) राहत्या घरी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले आहे. बुधवारी दुपारी १२:३० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातु, जावई असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे निधन झाले. आईची लावणीची (Lavani) परंपरा पुढे अविरत नेण्यासाठी मुलाचा हातभार होता. आता त्यांच्या मुलानंतर मुलगी लावणीसम्राज्ञी वर्षा संगमनेरकर आईची लावणीची परंपरा पुढे नेत आहे. गुलाब बाईंच्या आकस्मित निधनानं लोककलेच्या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी कोकिळ आवाजात गायलेल्या थोडक्यात लावण्यांपैकी 'राजसा जवळी जरा बसा' या लावणीवर गुलाब बाईंनी आपल्या खास अदाकारी कराव्यात अशी इच्छाच खुद्द लताताईंनी व्यक्त केली होती. गुलाबबाईंनी शब्द पाळत लावणीवर ठसकेदार अदाकारी सादर केली. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनात गुलाबबाई यांनी गायलेल्या बऱ्याच लावण्या आकाशवाणीवरील कामगार सभेत प्रसारित केल्या जायच्या.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा 'विठाबाई नारायणगावकर' या जीवनगौरव पुरस्कारने गुलाबबाईंचा सन्मान करण्यात आला होता. लावणी क्षेत्रातील मुख्य व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगावकर या पुरस्काराच्या मानकरी, आपल्या जन्मभूमीचे आयुष्यभर नाव मिरवणारे जेष्ठ कलावंती 'गुलाबमावशी संगमनेरकर' अशी गुलाबबाईंची ओळख.

गुलाबबाई या महाराष्ट्रातील लोकप्रिय कलावंतीन आहेत. बैठकीच्या लावणीसाठी गुलाबबाई संगमनेरकरचे नाव आघाडीवर होते. गुलाबबाई संगमनेरकर यांना आयुष्यभरात अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच 'रज्जो' या सिनेमातही भूमिका केली आहे. गुलाबबाईंनी फडाच्या तमाशातही काम केले आहे. गुलाबबाई संगमनेरकर यांच्याकडे अनेक ठासून कला भरलेल्या आहेत. त्या सर्वगुणी संपन्न कलाकार होत्या. गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन झाले असले तरी त्यांनी लावणीचा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी मागे ठेवला आहे.

Edit By- Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election : काँग्रेसचा मोदींवर पलटवार; पाकिस्तान, बिर्याणीचा संबंध जोडत गंभीर आरोप

Expensive country : जगातील ५ सर्वात महागडे देश; राहणे-खाणे आणि फिरायचा खर्च पाहून डोळे फिरतील

Live Breaking News: मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

SCROLL FOR NEXT