Dashavatara Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dashavatara: हा चेहरा नेमका कोणाचा? 'दशावतार'चे रहस्यमयी गूढ लवकरच उलगडणार!

Dashavatara Marathi Movie: ‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

Shruti Vilas Kadam

Dashavatara Marathi Movie: ‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. काळसर रंगाचे रंगवलेले रौद्र रूप, लालसर डोळे आणि विलक्षण कटाक्ष, या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणारी याची उत्कंठा अधिकच वाढते आहे.

सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट कोकणातील प्राचीन दशावतारी परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, मात्र त्याचवेळी उत्सुकता देखील निर्माण करतोय. हे दिलीप प्रभावळकरच आहेत का? असा प्रश्न पडतो आहे आणि ते नेमके या रुपात काय करणार आहेत याचे कुतूहल निर्माण करत आहे.

सध्या केवळ चेहऱ्याची एक झलक समोर आली असून त्यामागचं खरं रूप, त्याचा संदर्भ आणि कथा अजूनही गूढतेच्या पडद्यात दडलेली आहे. पोस्टरवर दिसत असलेला चेहरा आणि त्याचे हावभाव मनात भिती निर्माण करुन चित्रपटाबद्दल व त्याच्या गोष्टीबद्दल उत्सुक्ता निर्माण करण्याचे काम करतो.

पोस्टर वरुन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची ही वेगळीच भूमिका असणार, याचा अंदाज येतोय पण नेमकी ही भूमिका काय असेल याची उत्कंठा आता अधिकाधिक वाढतेय. अर्थातच हे रहस्य १२ सप्टेंबरला रुपेरी पडद्यावरच उलगडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार यांची महात्मा फुले वाड्याला भेट

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

SCROLL FOR NEXT