suhani bhatnagar death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhani Bhatnagar Death: 'दंगल' फेम अभिनेत्रीचं १९ व्या वर्षी निधन; मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर

Suhani Bhatnagar News: आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातील बबिता फोगाटचे बालपणीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं वयाच्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे.

Chetan Bodke

Suhani Bhatnagar Death

बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातील बबिता फोगाटचे बालपणीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं वयाच्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. 'दंगल' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असलेली सुहानी भटनागरचे वयाच्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. 'दंगल' चित्रपटामध्ये आमिर खानच्या मुलीचे पात्र सुहानीने साकारले होते. सुहानी भटनागरच्या मृत्यूचे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे. तिच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. (Bollywood)

अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांकडून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. 'दंगल' चित्रपटानंतर सुहानी सिनेसृष्टीपासून लांब होती आणि ती सोशल मीडियावरही जास्त सक्रिय नव्हती. सुहानी दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या फरिदाबाद जिल्ह्यामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरीदाबाद येथील सेक्टर-१५ मधील अजरौंडा स्मशानभूमीत अभिनेत्रीवर आजच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Bollywood Actress)

गेल्या काही दिवसांपूर्वीच सुहानीचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या अपघातामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला. त्या औषधांचे तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचू लागलं. संपूर्ण शरीरात पाणी साचल्यामुळे सुहानीचं वयाच्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. सुहानीवर दिल्लीतल्या एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यानच आज अभिनेत्रीचं निधन झालं आहे. (Bollywood News)

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातून सुहानीने बॉलिवूड डेब्यू केले होते. या चित्रपटातून तिला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुहानीने एक मुलाखत दिली होती. तेव्हा तिने, "सध्या मी शिक्षणाला प्राधान्य देत आहे. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. " असं ती त्या मुलाखती मध्ये म्हणाली होती. पण अभिनेत्रीचं हे स्वप्न कायमचच अपूर्ण राहिले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर 'घातपात', आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास करा; महिला नेत्याची मागणी

Ramayana Movie: सेम टू सेम; दिव्य रूप अन् तीक्ष्ण नजर, रणवीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील फोटो झाले लीक

Jaiphal Benefits For Male: पुरूषांसाठी जायफळ का आहे फायदेशीर?

Railways Rule: जर ट्रेन चुकली तर त्याच तिकिटावर दुसऱ्या गाडीनं प्रवास करता येतो? काय आहे रेल्वेचा नियम?

Maharashtra Live News Update: खेळताना मुलीला का बघता? वडिसांसहित चुलत भावाला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT