Dagadi Chawl 2 Movie News Updates Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dagdi Chawl 2 : डॅडी आणि शकीलच्या गॅंगवॉरमध्ये अडकणार का सूर्या?

मराठी सिनेसृष्टीतील धमाकेदार अॅक्शन सिनेमा म्हणजे 'दगडी चाळ'. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या सिनेमाचा दुसरा भाग 'दगडी चाळ २' लवकरच प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील धमाकेदार अॅक्शन सिनेमा म्हणजे 'दगडी चाळ'(Dagdi Chawl). हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. दगडी चाळ या सिनेमामुळे पुन्हा प्रेक्षकांना अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी उर्फ डॅडीची आठवण झाली. या सिनेमामध्ये एक सर्वसामान्य घरातील मुलगा कसा गुन्हेगारी विश्वात खेचला जातो हे दाखवण्यात आले होते. आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग 'दगडी चाळ २' प्रदर्शित होणार आहे.

चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' या सिनेमामध्ये अजून जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. कारण आगामी सिनेमामध्ये सूर्या आणि डॅडीच्या वादात आता शकील नवीन वळण आणणार आहे. दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ या म्हणीनुसार या सिनेमामध्ये आता डॅडी आणि सूर्याच्या वादात शकील कसा स्वतःचा फायदा करून घेतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

म्हणतात ना शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र हीच डोकॅलिटी वापरून 'शकील'ने मारलेली कमाल एन्ट्री प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवत आहे. 'डॅडी' ची ऑफर सूर्या स्वीकारतो की शकीलसोबत हात मिळवतो हे गुपित अजून गुलदस्त्यातच आहे. शकीलने दिलेली ऑफर सूर्या स्वीकारेल का? की 'डॅडी'चा काही वेगळा प्लान आहे याचे उत्तर येत्या १९ ऑगस्टला प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावरच समजेल.

या सिनेमात अंकुश चौधरी(Ankush chaudhari), पूजा सावंत, मकरंद देशपांडे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर शकीलच्या भूमिकेत अशोक समर्थ साकारणार आहेत. दहशत, गॅंगवॉर, राजकारण , अॅक्शन आणि लव्हस्टोरी पुन्हा एकदा 'दगडी चाळ २' मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT