salman khan And Anubhav kashyap:  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खान गुन्हेगार आहे...; दबंग दिग्दर्शकाने खान कुटुंबावर लावले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

salman khan And Anubhav kashyap: 'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान खान आणि त्याच्या भावांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Shruti Vilas Kadam

Salman Khan: अनुराग कश्यपचा भाऊ आणि चित्रपट निर्माता, दिग्दर्शक अभिनव कश्यपने त्याच्या पहिल्या चित्रपट 'दबंग'ने मोठे यश कमवले. या वर्षी या चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण झाली. तथापि, अभिनव म्हणतो की चित्रपटातील मुख्य अभिनेता सलमान खानसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव वाईट होता. त्याने यापूर्वी सलमानवर आरोप केले आहेत आणि अलीकडेच त्याला गुंडही म्हटले आहे.

सलमानची इमेज चेंज

अभिनव म्हणाला की दबंगची निर्मिती सुरू असताना सलमानची मेज 'वॉन्टेड' आणि 'तेरे नाम' सारख्या चित्रपटांमुळे एका गुंडा सारखी झाली होती. दबंगसाठी त्याला ही इमेज चेंज करायची होती. अभिनवने स्पष्ट केले की त्याने सुरुवातीला मुख्य अभिनेता म्हणून अरबाज खानशी संपर्क साधला होता, परंतु नंतर अरबाजने चित्रपटाची निर्मिती करण्याची ऑफर दिली आणि सोहेल खानसह सलमानसोबत मिटींग आयोजित केली. त्यानंतर त्याला १० लाख रुपयांची करार रक्कम देण्यात आली आणि काम सुरू करण्यास सांगितले.

सलमान आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध आरोप

अभिनवने सांगितले की चित्रपटाशी संबंधित अनेक निर्णय त्याच्या नकळत घेतले गेले, जसे की सोनाक्षी सिन्हाला नायिका म्हणून कास्ट करणे. अभिनव म्हणला की सलमान आणि त्याचे कुटुंब "सामान्य लोक नाहीत" आणि त्यांच्यावर गुन्हेगारी खटले देखील आहेत. तो म्हणाला, "सलमान खान एक असभ्य, घाणेरडा माणूस आहे. त्याला अभिनयात रस नाही; तो फक्त स्टारडमचा आनंद घेतो."

अनुराग कश्यपची कथा

अभिनवचा भाऊ अनुराग कश्यपचाही सलमान खानसोबत वाद झाला होता. अनुराग तेरे नाम चित्रपट लिहित होता, परंतु जेव्हा त्याने सलमानला या भूमिकेसाठी छातीचे केस वाढवावे लागतील असे सुचवले तेव्हा त्याला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला दबंग बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्याचे दोन सिक्वेल तयार झाले, परंतु अनुरागचा त्यात नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी परतूर येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

SCROLL FOR NEXT