Water logging News Rajinikanth Residence Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajinikanth यांना बसला चेन्नईतील पूराचा फटका, पोएस गार्डन येथील घरामध्ये शिरलं पाणी; VIDEO व्हायरल

Rajinikanth Residence Video: या पूराचा फटका साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना देखील बसला आहे. रजनीकांत यांच्या घरामध्ये देखील पूराचे पाणी शिरलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिवर व्हायरल होत आहे.

Priya More

Water logging News Rajinikanth Residence:

तमिळनाडू (Tamilnadu) आणि आसपासच्या परिसराला 'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा (cyclone michaung) मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पूर आला असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूराचे पाणी शहरामध्ये शिरल्यामुळे अनेक परिसरातील घरं पाण्याखाली गेली आहेत. या पूराचा फटका साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना देखील बसला आहे. रजनीकांत यांच्या घरामध्ये देखील पूराचे पाणी शिरलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिवर व्हायरल होत आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळाचा चेन्नईला फटका बसला आहे. सुपरस्टार रजनीकांत याचे चेन्नईच्या पोएस गार्डन या पॉश एरियामध्ये घर आहे. मुसळधार पावसामुळे या परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रजनिकांत यांच्या घरालाही पूराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्याच्या घराच्या परिसरात पूराचे पाणी शिरलं आहे. व्हिडीओमध्ये रजनीकांत यांच्या घराबाहेरील रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे. त्याचसोबत त्यांच्या घरामध्ये देखील पाणी शिरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. रजनीकांत यांच्या घराच्या परिसरातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रजनीकांत पोएस गार्डन येथील घरी नव्हते आणि त्यांचे कुटुंबही दुसरीकडे स्थलांतरित झाले आहे. रजनीकांत यांच्या घरात पाणी शिरल्याचा व्हिडिओ एका चाहत्याने शूट केला आहे. जो पाहून प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. 'थलायवा' सुद्धा या पूरस्थितीत अडकल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत सध्या चेन्नईबाहेर आहेत. ते सध्या तिरुनेलवेली असून या ठिकाणी 'थलाईवर 170' या त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी आमिर खान आणि विष्णू विशाल हे देखील चेन्नईच्या पुरात अडकले होते. विष्णू विशालने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. ज्यात तो आणि आमिर एनडीआरएफच्या बोटीत बसलेले दिसत होते. पूरामध्ये अडकलेल्या या दोघांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केले होते. विष्णू विशालची पत्नी आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाही तिथेच होते. विष्णू विशालने फोटो शेअर करून एनडीआरएफच्या टीमचे आभार मानले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT