Kangana Ranaut React To Salman Khan Receiving Threat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Threat And Kangana Ranaut: 'देश मोदी-शाह यांच्या हातात सुरक्षित', सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर कंगनाचं वक्तव्य

कंगना रनौत सध्या हरिद्वार दौऱ्यामुळे भेटीमुळे चर्चेत आली. यादरम्यान सलमान खानला मिळालेल्या धमक्यांवर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut React To Salman Khan Receiving Threat: कंगना रणौत अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती चर्चेत असते. नेहमीच खान ब्रदर्सच्या नावाने त्यांना नेहमीच काही ना काही बोलणारी कंगना आता सलमान खानला मिळालेल्या धमक्यांवर तिने प्रतिक्रिया दिली. कंगना रनौत सध्या हरिद्वार दौऱ्यामुळे भेटीमुळे चर्चेत आली.

दरम्यान सलमान खानला मिळालेल्या धमक्यांवर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे, कंगना म्हणते, “देश आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षित हातात आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत घाबरण्याचे कारण नाही.”

एएनआयया वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणते, “आम्ही अभिनेते आहोत. केंद्राने सलमान खानला सुरक्षा पुरवली आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सुरक्षा मिळत आहे, त्यामुळे घाबरण्यासारखे कोणतेही कारण नाही. जेव्हा मला धमकी देण्यात आली होती, तेव्हा मलाही सरकारने सुरक्षा दिली होती, आज देश सुरक्षित हातात आहे, तर आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही.” (Bollywood Actress)

रविवारी उत्तराखंडमधील हरिद्वारला पोहोचलेल्या कंगना रनौतने गंगा आरती केली. यानंतर अभिनेत्री केदारनाथलाही जाणार आहे. तिच्या या दौऱ्याबद्दल बोलताना कंगना म्हणते, “मला केदारनाथ धामला भेट देण्याची नेहमीच इच्छा होती आणि आता ते अखेर घडले.” (Bollywood)

धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानला Y+ सुरक्षा दिली आहे. शनिवारी, अभिनेता प्रथमच त्याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर बोलली. 'आप की अदालत' या टीव्ही शोमध्ये बोलताना सलमान म्हणातो, “असुरक्षिततेच्या जाणीवेपेक्षा सुरक्षा केव्हाही चांगली आहे. आता रस्त्यावर सायकल चालवणं आणि कुठेही एकट्यानं जाणं माझ्यासाठी कठीण होऊन बसलं आहे. आणि यापेक्षा अधिक मला चिंता लागते, जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये फसतो, तिथे तर जास्तच सुरक्षा असते. आणि मग आजुबाजूला असलेल्या गाड्या दुसऱ्या लोकांना अडचण निर्माण करतात. मग ते लोक मला तिरकस लूक देतात. अर्थात माझे चाहतेच असतात ते सगळे. पण एक मोठा धोका आहे माझ्या जीवाला म्हणून ही सगळी सुरक्षा....”

गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरवर कंगना पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. बॉलिवूड माफिया म्हणत सलमानला नेहमीच खडेबोल सुनावणाऱ्या कंगनाने चक्क सलमानला मिळालेल्या धमक्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडापावला मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

SCROLL FOR NEXT