Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे झाले नथुराम गोडसे; 'त्या' चित्रपटामुळे आता नवा वाद (पहा Video) Saam TV
मनोरंजन बातम्या

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे झाले नथुराम गोडसे; 'त्या' चित्रपटामुळे आता नवा वाद (पहा Video)

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एका चित्रपटामध्ये नथुराम गोडसेंची भूमिका केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोल्हेंच्या 'त्या' चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एका चित्रपटामध्ये नथुराम गोडसेंची भूमिका केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोल्हेंच्या 'Why I Killed Gandhi' चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

याबाबतची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी आपल्या Facebook पोस्टद्वारे दिली असून 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे हा चित्रपट वादात सापडण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 2017 सालचा असून तो सध्या फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या 30 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Controversy over Amol Kolhe's Why I Killed Gandhi movie)

पहा व्हिडीओ -

दरम्यान त्यांच्या या चित्रपटाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ते म्हणाले 'अनेकांनी मला विचारलं डॉक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत कसं यावरती मी त्यांना सांगितलं जे मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं, “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला सारला तर मला यामध्ये सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे 'Reel लाईफ' आणि 'Real लाईफ' यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.

तसंच 2017 मध्ये या सिनेमाचं (Movie) चित्रीकरण झालं, तेंव्हा मी राजकारणात नव्हतो, तसंच कोणत्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी पुर्णपणे सहमत असतोच असं नाही. काही भूमिकांशी आपण सहमत असतो, तर काहीं विचारधारेंशी सहमत नसतानाही भूमिका करतो.

शिवाय एक कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखाद्याला एक गोष्ट मांडायची असताना ते कलाकार म्हणून माझ्याकडे आले आणि मी ती भूमिका केली. एवढी साधी ही गोष्ट आहे. तसंच कलाकार आणि राजकीय भूमिका या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे आणि सुजाण नागरिक ही गोष्ट पाळतील अशी माझी खात्री आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

SCROLL FOR NEXT