Phakaat Trailer Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Phakaat Trailer Out: भारत-पाकिस्तानच्या संघर्षाला विनोदाचा तडका: 'फकाट'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Phakaat Trailer: ‘फकाट’ येत्या १९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Pooja Dange

Marathi Movie Phakaat Trailer Released: धमाकेदार गाणी आणि भन्नाट टिझर प्रदर्शित झाल्यानंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. श्रेयश जाधव प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी हटके विषय घेऊन येतात. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा सुद्धा एक वेगळाच चित्रपट असल्याचे दिसतेय.

ट्रेलरमध्ये भारत -पाक यांच्यातील संबंध, कॉमेडी, प्रेम असे सगळेच पाहायला मिळत आहे. एलओसी सारखा गंभीर विषय असताना हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे यांची धमालही दिसतेय. घरच्यांनी या दोघांकडून कसलीच आशा ठेवलेली नसते.

तर या दोघांनीही आपण काहीच करू शकत नाही हे मनाशी पक्क केलेलं असतं अचानक हेमंत आणि सुयोगच्या हाती एक हायली कॅान्फिडेन्शिअल फाईल लागते आणि त्यानंतर ते त्या फाईलची काय विल्हेवाट लावतात, यादरम्यान त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यानंतर जो धिंगाणा होतो तो ‘फकाट’मध्ये पाहायला मिळणार आहे. (Latest Entertainment News)

ट्रेलरमध्ये अभिजीत खांडकेकर याचीही झलक दिसत आहे. त्यामुळे आता त्याची यात काय भूमिका आहे, हे ‘फकाट’ पाहिल्यावरच कळेल. 'फकाट'च्या निमित्ताने कबीर दुहान सिंग मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तो नकारात्मक भूमिकेत दिसत असून त्याचा एक वेगळाच दरारा या चित्रपटात दिसत आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ‘’ हा एक धमाल मनोरंजन करणारा चित्रपट असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे. चित्रपटात या कलाकारांनी जो धिंगाणा घातला आहे, तो कमाल आहे. ‘फकाट’ विनोदी असला तरी यातून एक छान संदेशही देण्यात आला आहे. यात भारत पाकिस्तानचा संदर्भ आहे, मात्र कोणच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींना आवडतील अशीच आहेत.''

वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित या चित्रपटात हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, अनुजा साठे, रसिका सुनिल, नितीश चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘फकाट’ येत्या १९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Officers Transferred: निवडणुकीपूर्वी 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश; मुंबई महापालिकेत चार नवे सहायक आयुक्त दाखल

Pune News : पुण्यातील कुख्यात गुंडाची बड्या राजकीय नेत्यांसोबत उठबस? अनेक व्हिडिओ समोर; राजकीय वर्तुळात खळबळ

Food Delivery Robot: पिझ्झापासून किराणापर्यंत सर्व काही घरपोच; रोबो करणार सुरक्षित डिलिव्हरी

Maharashtra Live News Update: तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा उशिराने सुरु

Shocking : धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT