Bhau Kadam SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhau Kadam : कॉमेडी किंग भाऊ कदमचा सिरियल किलर अंदाज, मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी पाहाच

Serial killer : आपल्या कॉमेडी आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे भाऊ कदम आता एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा 'सिरियल किलर' अंदाज पाहाच.

Shreya Maskar

अभिनेते आणि कॉमेडियन भाऊ कदम (Bhau Kadam) एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॉमेडीचा हा शार्प शूटर 'सिरियल किलर' (Serial killer) मधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हे एक धमाल नाटक आहे. हे नाटक येत्या शनिवारी १२ ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होणार आहे.

'सिरियल किलर' या नाटकात भाऊ कदम हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच त्यांच्यासोबत अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे, तेजस पिंगुळकर हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. हे कलाकार रंगभूमीवर धमाल करणार आहेत. हे नाटक खूप मनोरंजक आहे. यात मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये एक घटना घडते आणि त्यामुळे संशयाचे सुरुंग पेरले जाते. 'सिरियल किलर' नक्की कोण? हे ओळखण्याचा धमाल खेळ या नाटकात पाहायला मिळणार आहे. हे फुल टू कॉमेडी नाटक आहे,

'सिरियल किलर' या नाटकाचे दिग्दर्शिक केदार देसाई आहेत. तर या नाटकाची निर्मिती राहूल भंडारे आणि प्रणय तेली यांनी केली आहे. तसेच अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट अंतर्गत हे नाटक आहे. नाट्यरसिकांना भाऊ कदम आणि अद्वैत थिएटर्स देण्याचा प्रयत्न करत असतात. नाटकात संगीत विजय गवंडे यांनी दिले आहे. तर नाटकाचा सूत्रधार सुनील पानकर, गोट्या सावंत आहेत. भाऊ कदम यांच्या या कॉमेडी मेजवानीचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT