Zakir Khan saam tv
मनोरंजन बातम्या

Zakir Khan : प्रसिद्ध कॉमेडियनची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील 'त्या' VIDEO मुळे चाहते चिंतेत

Zakir Khan Hospitalised : प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खान रुग्णालयात दाखल आहे. त्याला नेमकं झालं काय, जाणून घेऊयात. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

कॉमेडियन झाकीर खान रुग्णालयात दाखल आहे.

झाकीर खानचे हेल्थ अपडेट जाणून घेऊयात.

झाकीर खानने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवतो.

कॉमेडियन झाकीर खान (Zakir Khan) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. मात्र आता झाकीर खान रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. झाकीर खान सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. झाकीर खानचा भाऊ अरबाज खानने नुकत्याच त्याच्या व्हलॉगमध्ये झाकीर खानची झलक दाखवली आहे.

झाकीर खान रुग्णालयात दाखल असल्याचे समजताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अरबाज खानने शेअर केलेल्या व्हिडीओत जाकिर खान रुग्णालयात दिसत आहे. रुग्णालयात सर्वजण टी-२० विश्वचषक फायनल पाहताना दिसत आहे. झाकीर मॅचचा आनंद घेत आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने विचारले की, "झाकीर खान, तू ठीक आहेस ना? तुझे हेल्थ अपडेट सांगत जा", दुसऱ्या युजरने लिहिलं की, "लवकर बरा हो झाकीर भाई..."

अरबाज खानच्या रमझान व्हलॉगमध्ये झाकीर खान दिसला. रुग्णालयात फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या एका रुममध्ये झाकीर खान होता. त्यांच्यासोबत आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी श्रद्धा देखील होती. झाकीर खान त्याच्यासोबत हसत-खळत गप्पा मारताना दिसला. जाकिर खानच्या हेल्थ बाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या असता, त्याने सांगितले की, "तब्येत थोडी खराब आहे, जास्त खराब नाही...तुम्ही जे इंटरनेटवर वाचत आहात त्या सर्व अफवा आहेत..."

झाकीर खानने घेतला ब्रेक

अलिकडेच झाकीर खानने स्टँड-अप कॉमेडीपासून ब्रेक घेतल्याची घोषणा केली. ज्यामुळे चाहते खूप नाराज झाले. तसेच चिंतेत पडले. त्यानंतर झाकीरने त्याच्या तब्येतीमुळे असे पाऊल उचलल्याचे सांगितले. झाकीर खानने 'गल्फ न्यूज'शी बोलताना सांगितले की, "माझ्या कुटुंबात काही अनुवांशिक आजार आहेत, जे एका वयानंतर उद्भवतात. गेल्या काही वेळापासून मला खूप त्रास झाला आहे. त्यामुळे आता मला विश्रांतीची गरज आहे..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

20 वर्षाच्या नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कारानंतर हत्या; गुप्तांगातून रक्तस्त्राव अन् पोस्टमार्टम रिपोर्टने खळबळ

Maharashtra News Live Update: उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

Facebook Instagram Down: फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक ठप्प; जगभरातील करोडो नेटकऱ्यांना मोठा फटका

Acidity : चपाती की भात, कोणता पदार्थ वाढवतो ॲसिडीटी?

Moong Dal Bhaji Recipe: चहासोबत खाण्यासाठी घरच्या घरी बनवा खमंग आणि स्वादिष्ट मूग डाळ भजी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT