Hasatay Na Hasayala Pahije Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!'चा पहिला प्रोमो आऊट, तुम्हीही पाहून पोटधरून हसाल

Hasatay Na Hasayala Pahije Show Promo: संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारे निलेश साबळे आणि भाऊ कदम आता नव्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' या शोच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना पुन्हा हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Priya More

Hasatay Na Hasayala Pahije Show:

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या आवडता शो 'चला हवा येऊ द्या' च्या (Chala Hawa Yevu Dya Show) माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारे निलेश साबळे आणि भाऊ कदम आता नव्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' या शोच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना पुन्हा हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच कलर्स मराठीने या शोचा प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हसताना दिसत आहेत.

कलर्स मराठी वाहिनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' या शोचो प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हसवणारे तीन हुकुमी एक्के डॉ निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने! ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!', 20 एप्रिलपासून शनि-रवि रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर.' त्यामुळे आता २० एप्रिलपासून हसण्यासाठी तुम्ही देखील तयार राहा.

प्रोमोमध्ये निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे तिघेही सुरूवातीला गंभीर चेहऱ्यामध्ये दिसत आहेत. पण नंतर एक-एक करत तिघेही जोरजोरात हसू लागतात. कलर्स मराठीने पोस्ट केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, 'अरे व्वा, एकसाथ तीन एक्के बाजी मारणार पक्के, खुप शुभेच्छा.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'कोणताच नवीन कार्यक्रम आणि नवं channel चला हवा येऊ द्या आणि zee marathi ला replace करू शकत नाही.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'खूप खूप शुभेच्छा ह्या नव्या कार्यक्रमासाठी, मस्त कार्यक्रम असणार आहे फुल टू कॉमेडी.'

'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' या शोच्या माध्यमातून निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. या शोमध्ये निलेश साबळेसोबत भाऊ कदम, ओंकार भोजने यांच्यासह सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार सर्वांना हसवणार आहेत.'हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!' या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅामेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार प्रत्येक भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT