Indrayani SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indrayani : 'इंद्रायणी' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री; दिग्रसकरांच्या कुटुंबावर मोठे संकट, पाहा VIDEO

Indrayani Marathi Serial Update : 'इंद्रायणी' मालिकेत आता नवीन पात्राची एन्ट्री झाली आहे. दिग्रसकरांच्या कुटुंबावर 'श्रीकला' नावाचे मोठे संकट आले आहे. मालिकेत पुढे काय घडणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'इंद्रायणी' मालिकेत आता नवीन वळण पाहायला मिळत आहे.

दिग्रसकरांच्या कुटुंबात 'श्रीकला'ची एन्ट्री झाली आहे.

श्रीकलाच्या रूपाने दिग्रसकरांच्या आयुष्यात मोठे संकट आले आहे.

'इंद्रायणी'च्या आयुष्यात मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे. 'कलर्स मराठी'वरील 'इंद्रायणी' मालिकेतील कथानक आता अधिकच रोमांचक वळण घेत आहे. इंद्रायणीला वारंवार येणाऱ्या संकटाविषयीचे संकेत सतत मिळत आहेत. तिच्या मनात अस्वस्थता आहे. कारण तिला वारंवार एकच संकेत मिळतोय "संकट येणार आहे!" तिच्या स्वप्नात तिला अलर्ट करणारे गोविंद महाराज आणि त्यानंतर त्याच स्वप्नात दिसणाऱ्या संकटाचे सावट म्हणजेच श्रीकला. श्रीकलाचा चेहरा पाहून इंदू गोंधळलेली आहे.

'इंद्रायणी' मालिकेत श्रीकलाची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. नेमकं श्रीकला हीच दिग्रसकर घराण्यावरचे संकट आहे का? की काहीतरी अजून खोल दडलंय? हे सर्व येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल. श्रीकला बाबत असलेली इंदूची शंका खरी ठरणार का? इंद्रायणी आता दिग्रसकर कुटुंबाची सून म्हणून आणि घराची रक्षणकर्ती म्हणून घराचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मग ते संकट कोणत्याही रूपात येवो, इंद्रायणी त्यासाठी खंबीर असल्याचे पाहायला मिळत आहे.

श्रीकलाच्या मनसुब्यांवर इंद्रायणी कशी मात करणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. एकीकडे इंद्रायणीला मिळालेले संकेत तर दुसरीकडे श्रीकला बद्दल गोपाळ आणि घरच्यांची वाढती आपुलकी. या सगळ्यातून इंद्रायणी श्रीकलाचे खरं रूप काय, हे कसं शोधून काढणार? गोपाळच्या मनात श्रीकला बद्दल असलेल्या भावना याचा श्रीकला पुरेपूर वापर करून दिग्रसकर कुटुंबात एन्ट्री घेण्याचा तिचा प्लान इंद्रायणी यशस्वी होऊ देईल का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

'इंद्रायणी' समोर आता श्रीकला नावाचे नवीन आव्हान आले आहे. एकीकडे गोपाळने केलेली श्रीकला सोबतच्या लग्नाची घोषणा आणि दुसरीकडे इंदूच्या मनात भीतीचे सावट या सर्व घटनांच्या दरम्यान इंदू विठूरायाकडे उत्तर शोधतेय. येणार एपिसोड खूपच रोचक असणार आहे. श्रीकलाच्या रूपाने दिग्रसकरांच्या आयुष्यात आलेले हे संकट इंदू कसं ओळखते आणि त्यावर कशी मात करते? हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. 'इंद्रायणी' मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple कडून मोठा धमाका होणार; नव्या वर्षांत महत्वाची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटूची बहीण लेस्बियन? नेमकं प्रकरण काय? चहर का भडकला?

Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT