CISF Constable Kulwinder Kaur Post Saam TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Slapped : 'आईच्या सन्मानासाठी हजारो नोकऱ्यांचा त्याग करेल...', कंगना रणौतला कानशिलात देणाऱ्या CISF कॉन्स्टेबलचं सडेतोड उत्तर!...

Chetan Bodke

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांना गुरुवारी चंदीगड विमानतळावर CISF महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावली. यानंतर या CISF महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. 'शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल' कंगना रणौतला कानाखाली मारणाऱ्या CISF महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरच्या विरोधात आयपीसी कलम 323 आणि 341अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, त्या CISF महिला कॉन्स्टेबलवर निलंबनाची करण्यात आलेली आहे. तिच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर कुलविंदर कौरने X पोस्ट शेअर केलेली आहे.

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, कुलविंदर कौरने सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट करत लिहिले की, "मला नोकरीची चिंता नाही. आईच्या सन्मानासाठी हजारो नोकऱ्यांचा त्याग मी करेल." सध्या CISF महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरच्या X पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. ही पोस्ट तिने काल शेअर केली होती.

चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला कॉन्स्टेबलने कंगना रणौतच्या कानशिलात लगावली. त्या CISF महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असून तिच्याविरोधात विमानतळ पोलिसांकडे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. कुलविंदर कौरवर आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आज गुन्हा दाखल झाल्यानंतर कुलविंदर कौरने पुन्हा एक X पोस्ट शेअर केलेली आहे. त्यामध्ये तिने लिहिले की, "मला नोकरीची धमकी देऊ नका. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे, मला स्वत:चा उत्तम जीवन कसं जगायचं, हे माहित आहे. माझ्यात इतकी क्षमता आहे की मी संघर्ष करून पुन्हा नोकरी मिळवू शकेन..."

४ वर्षांपूर्वी देशभरामध्ये कृषी कायद्याविरोधात देशभरातल्या अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. शेतकरी आंदोलकांना कंगना रणौत म्हणाल्या होत्या. यामुळे कुलविंदर कौरने अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावली आहे. ४ वर्षांपूर्वी कंगनाने ट्वीट केले होते की, "हा हा हा... ह्या त्याच आजी आहेत, ज्यांचा टाईम मॅगझीनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता. त्या सध्या शेतकरी आंदोलनामध्ये १०० रुपये घेऊन उपलब्ध झाल्या आहेत." अभिनेत्रीला या ट्वीटमुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने ते ट्वीट डिलीट केले.

कंगनाच्या या वक्तव्यावर महिला CISF कॉन्स्टेबल चांगलीच भडकली होती. चंदीगड विमानतळावर कंगनासोबत झालेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. महिला CISF कॉन्स्टेबल कंगनाला म्हणाली होती की, "शेतकरी आंदोलनात प्रत्येक महिला १०० रुपये घेऊन बसायच्या. त्याच्यामध्ये माझी आई पण तिथे होती." कंगनाने केलेल्या त्या विधानामुळे ती महिला CISF कॉन्स्टेबल प्रचंड संतापली होती. त्यामुळेच तिने तिच्या थेट कानशिलात ठेवून दिली होती. घटना घडल्यानंतर कंगनाने एयरपोर्ट विमानतळावरील पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता त्या महिला CISF कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

Chandrapur News : अवैध धंदे रोखण्यासाठी चकपिरंजी ग्रामसभेत अनोखा ठराव; शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी टाकली अट

SCROLL FOR NEXT