Ranveer Singh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: एनर्जेटीक रणवीरची हळवी बाजू... व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल रिअल हीरो

रणवीर सिंह सध्या सर्कस चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर रणवीरचा मोठा चाहता वर्ग आहे. रणवीरची अॅक्टिंग, स्टाईल, फॅशन यामुळे तरुणांमध्ये त्याची भलतीच क्रेज आहे.

Chetan Bodke

Ranveer Singh: रणवीर सिंह सध्या सर्कस चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर रणवीरचा मोठा चाहता वर्ग आहे. रणवीरची अॅक्टिंग, स्टाईल, फॅशन यामुळे तरुणांमध्ये त्याची भलतीच क्रेज आहे. रणवीरही त्याच्या चाहत्यांना नाराज करत नाही. म्हणून तो सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण तेथे शेअर करत असतो.

असाच एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. रणवीर त्याच्या सर्कस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बराच व्यस्त आहे. रणवीरमुळे कार्यक्रमाला त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. इतक्या मोठ्या गर्दीत एक छोटा मुलगा हरवल्याने रडायला लागला होता. परत येताना रणवीरने मुलाला रडताना पाहिले. प्रमोशन दरम्यान रणवीरने गर्दीत रडणाऱ्या एका मुलाची विचारपूस केली, त्याला मांडीवर घेत त्याची विचारपूस ही केली.

त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका युजरने रणवीरचे कौतुक करताना लिहिले - वाह.. हे खूप गोड आहे. रणवीर सिंग तू सुपरस्टार आहेस. लव्ह यू हिरो. रणवीरच्या या स्टाईलने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

सध्या रणवीरचा आगामी चित्रपट सर्कसचे जोरदार प्रमोशन करत आहे. रणवीरचा हा चित्रपट २३ डिसेंबरला सिनेमाघरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लोक ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करतील. चित्रपटाचा ट्रेलर लोकांना बराच आवडला होता.

आता लोक चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. सर्कसमध्ये रणवीर सिंगची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे. जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, अजय देवगण आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT