Bigg Boss Marath SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : छोट्या पुढाऱ्याचा खेळ संपला, बिग बॉसने घन:श्याम दराडेला दिला नारळ!

Shreya Maskar

बिग बॉस मराठीत (Bigg Boss Marathi) प्रत्येक दिवशी नवीन काही तरी रंजक पाहायला मिळते . प्रेक्षकही याची बिग बॉस मराठीची रात्री आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक आठवडा हा खास असतो. हा संपूर्ण आठवडा पुन्हा एकदा निक्कीने गाजवला आहे. या आठवड्यात कोणाला बिग बॉस घराला टाटा बाय बाय कराव लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या आठवड्यात छोट्या पुढारीने बिग बॉस घराचा निरोप घेतला आहे. बिग बॉस मराठी ५ च्या घरातून या आठवड्यात घन:श्याम दरवडे एलिमिनेट (Ghanshyam Darode Eliminated) झाला आहे. त्याचा बिग बॉसचा प्रवास संपला.

कमी वोट मिळाल्यामुळे घन:श्याम दरवडे याचा हा प्रवास येथेच थांबला आहे.बिग बॉसच्या घरात या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले होते यात निक्की तांबोळी, घन:श्याम दरवडे,अरबाज पटेल, सूरज चव्हाण, धनंजय पोवार,आर्या जाधव, अभिजित सावंत इत्यादी सदस्यांचा समावेश होता. या नॉमिनेशन प्रक्रियेत प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळे आर्या, धनंजय, अभिजित आणि सुरज चव्हाण हे सर्व सदस्य सुरक्षित झाले आहेत.

आज भाऊच्या धक्क्यावर मोठ्या घडामोडी होणार आहेत. या आठवड्यात सूरज चव्हाण कॅप्टन पदी विराजमान झाला आहे. त्यामुळे रितेश देशमुखने त्याचे कौतुक केले आहे. तसेच 'कॅप्टनची योग्य जबाबदारी ओळखून भूमिका बजावा' असा सल्लाही दिला आहे.

आपल्या बोलण्याने घन:श्यामने बिग बॉस घरात स्वतःची वेगळी जागा तयार केली होती. बिग बॉसचे घर सोडताना छोटा पुढारी खूप भावूक झाला. निरोप घेताना तो म्हणाला की, खेळामध्ये असे होत राहते. खेळ जरी हरलो असलो तर घरात एक चांगली माणसे जोडली आहेत. तसेच चांगलं जगण्याचा प्रयत्न केला आहे. इथे डोक्याने गेम चालतो मात्र मी मनाने गेम खेळलो आहे. अस घन:श्याम बोलला. आपली मतं रोखठोक मांडणाऱ्या छोटा पुढारीने बिग बॉस मराठीचा निरोप घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT