HBD Farah Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Farah Khan : बॅक डान्सर ते कोरिओग्राफर; फराह खान आहे आता कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून डोळे चक्रावतील

Farah Khan Net Worth : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिचा आज वाढदिवस आहे. तिने आपल्या स्टाइलवर अनेक कलाकारांना नाचवले आहे. तिचा इंडस्ट्रीमधील प्रवास जाणून घेऊन तिची संपत्ती पाहूया.

Shreya Maskar

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान ( Farah Khan) आज (9 जानेवारी )ला 60 वर्षांची झाली आहे. तिने आपल्या कारकि‍र्दीत अनेक कलाकारांना डान्स शिकवला आहे. फराह खान ही उत्तम कोरिओग्राफर आहे. तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. फराह खान एक उत्तम होस्ट देखील आहे. कोरिओग्राफर आणि होस्टिंगमधून ती कोटींची कमाई करत आहे.

फराह खान ही प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि लेखिका आहे. तिचे आजवर अनेक चित्रपट हिट झाले आहेत. सध्या फराह खान 'सेलिब्रिटी मास्टर शेफ'मध्ये होस्टिंग करताना पाहायला मिळत आहे. फराह खानच्या डान्सवर मायकल जॅक्सनचा खूप प्रभाव होता. फराह खानने 'जीता वही सिकंदर'ची अनेक गाणी कोरिओग्राफ केली आणि तिने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करायला सुरुवात केली. वडिलांचे आजाराने निधन झाल्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एकेकाळी फराहने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे.

फराह खान संपत्ती

फराह खानकडे लग्जरी गाड्या आणि आलिशान घर आहे. तसेच ती अनेक ब्रँडसोबत कनेक्ट आहे. कोरिओग्राफर, होस्टिंग, लेखिका आणि दिग्दर्शक या सर्वांतून ती कोटींची कमाई करतो. फराहचे मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फराह खानची एकूण संपत्ती (Net Worth) 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ती गाणी कोरिओग्राफ करण्यासाठी लाखो रुपये घेते. तसेच तिचे एक प्रोडक्शन फाऊस आहे.

फराह खानने दिग्दर्शित केलेला ओम शांती ओम हा चित्रपट खूप गाजला होता. तसेच फराह खान अनेक डान्स शो जज देखील करते. यात 'नच बलिए' चा समावेश आहे. फराह खानने शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांची गाणी करिओग्राफ केली आहे. तिने आपल्या स्टाइलने चाहत्यांना वेड लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT