Actor Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत हळहळ

Actor Passed Away : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. अभिनेत्याने वयाच्या ३३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चीनचे प्रसिद्ध अभिनेते जिन झे (Jin Ze - मूळ नाव Zhang Jiawei- झांग जियावेई) यांचे वयाच्या ३३ व्या वर्षी निधन झाले. globaltimesच्या वृत्तानुसार , 'शेंगशी गुआंगनियन कल्चर कंपनी लिमिटेड'ने (Shengshi Guangnian) शनिवारी अधिकृत निवेदन जारी करून या वृत्ताला दुजोरा दिला.

एजन्सीच्या निवेदनानुसार, जिन झे यांचे गुरुवारी हांगझोऊ येथे निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की, अभिनेते जिन झे (झांग जियावेई) यांचे ४ जून २०२६ रोजी हांगझोऊ येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले..." तसेच या कठीण काळात अफवा पसरवू नये आणि कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

जिन झे यांचा जन्म ३० जानेवारी १९९३ रोजी शेंडोंग प्रांतातील वेईहाई येथे झाला होता. जिन झे उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच एक उत्तम मॉडेलही होते. अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहते, कलाकार मंडळींनी अभिनेत्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेते जिन झे यांनी 'बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी'मधून पदवी पूर्ण केली होती. त्यांनी मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. अलिकडच्या काळात 'मायक्रो-ड्रामा' आणि 'शॉर्ट-फॉर्म ड्रामा'च्या माध्यमातून त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Maharashtra News Live Update : नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! स्वतःचं धरण असूनही शुक्रवारपासून १०% कपात

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT