Chhota Pudhari Ghanshyam Darode saam tv
मनोरंजन बातम्या

Ghanshyam Darode: बदनामी करणाऱ्यांवर करावाई करा; नाहीतर आत्मदहन करेन, घनश्याम दरोडेचा इशारा

Chhota Pudhari Ghanshyam Darode: सोशल मीडियावर घनश्याम दरोडे अर्थात छोटा पुढारी याला सातत्याने ट्रोल केलं जात आहे. त्याच्या कुटुंबावर अश्लील टिप्पणी केली जात आहे. त्यामुळे छोटा पुढारी वैतागलाय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून 'मराठी बिग बॉस' फेम 'छोटा पुढारी' धनश्याम दरोडेला नेटकरी ट्रोल करत आहेत. सतत होणाऱ्या ट्रोलिंग कंटाळून घनश्यामने आत्मदहनाचा इशारा दिलाय. शरिरावर आणि कुटुंबावर अश्लील टिप्पणी करणाऱ्यांना आणि बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा, जर कारवाई केली नाही तर आत्मदहन करू असा इशाराच छोटा पुढारीनं दिलाय. (Dhanashyam Darode Warns of Self-Immolation)

सतत ट्रोल करणारे आणि बदनामी करणाऱ्यांवर तीन दिवसात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घनश्याम दरोडे यांनी केलीय. याबाबत त्याने पोलिसांमध्ये तक्रार दिलीय. सातत्याने ट्रोल केलं जात आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच काही ट्रोल करणाऱ्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर व्हायरल केले होते. याचा घनश्याम दरोडेला मानसीक आणि शारीरिक त्रास झालाय. ट्रोलिंग करणारे आणि बदनामी करणाऱ्यावर कारवाई केली जावी, जर कारवाई झाली नाहीतर आत्मदहन करेन असा इशारा घनश्याम दरोडेने दिलाय.

छोटा पुढारीच्या शारीरिक व्यंगावर आणि कुटुंबावर अश्लील टिप्पणी केली जातेय. त्यामुळे तो वैतागला असून आहे या सगळ्या गोष्टीमुळे घनश्यामला आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे पोलिसांना आत्मदहनाचा इशारा दिलाय. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर घनश्याम दरोडेला मंत्री उदय सामंत यांनी भेटीसाठी बोलावले आहे.

आपण यासर्व गोष्टीतून मार्ग काढू, असं आश्वासन मंत्री सामंत यांनी दिल्याची माहिती घनश्यामने दिलीय. मात्र माझी बदनामी करणाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर केल नाही तर मी मागे हटणार, अशी आक्रमक भूमिका दरोडे यांनी घेतलीय. दरम्यान घनश्याम दरोडे याने एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिलीय. त्याने या व्हिडिओतून ट्रोलिंग करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

काय म्हणाला घनश्याम दरोडे

मी ट्रोलिंग करणाऱ्यांचा विचार करत नव्हतो. पण मी गुन्हा दाखल करत नाही, घनश्याम बोलतोय तेच खरंय का? अशा पद्धतीने ट्रोल केलं जात होतं. तर काही फालतू लोकांना मला श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे मला मानसीक आणि शारिरीक त्रास झाला. त्यामुळे मी आता बदनामी करणाऱ्यांना आणि ट्रोलिंग करणाऱ्यांना सुट्टी द्यायची नाही. त्यामुळे मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. आज ती केस सायबरकडे आलीय. त्यामुळे फेक आयडीवाल्यांना लवकरात लवकर कायद्याने कारवाई झाली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

SCROLL FOR NEXT