India today
मनोरंजन बातम्या

Chhaava Teaser: 'छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और हम...' विकी कौशलच्या ‘छावा’चा टीझर पाहून अंगावर येईल काटा!

'Chhaava' Teaser: विकी कौशलच्या आगामी 'छावा' या चित्रपटाच्या टीझर रिलीज झालाय. विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून यात तो रौद्र अवतारात दिसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'छावा' चित्रपटाचा टीझर नुकताच लॉंच झाला. अभिनेता विकी कौशल या चित्रपटात संभाजी महाराजांच्या मुख्य भुमिकेत असणार आहे. लक्ष्मण उतेकरच्या दिग्दर्शित छावा चित्रपटात विकी कौशलचा न पाहिलेला रौद्र अवतार पाहायला मिळणार आहे. छावा चित्रपटाचा टीझर पाहुन प्रेक्षकांच्या अंगावर काटे उभे राहिलेत.

छावा चित्रपटाच्या टीझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपूत्र छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य कथा दाखवलीय. टीझर रिलजी झाल्यापासून सोशल मीडियावर 'छावा' चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलीय. या टीझरमध्ये विक्की कौशलची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज म्हणून करण्यात आलीय. छोट्या व्हिडिओमध्ये, विकी कौशल रौद्र रुपात दिसत आहे. शेकडोच्या संख्यने असलेल्या सैन्यावर विकी जोरदार हल्ला करताना दिसत आहे. तर टीझरच्या शेवटी, आम्हाला अक्षय खन्नाची झलक पाहायला मिळते. अक्षय खन्नालाही अनेकजण ओळखू शकले नाहीत, इतका सजग लूक त्याला देण्यात आलाय.

चित्रपटाचा टीझर 'स्त्री 2' सोबत रिलीज करण्यात आलाय. ज्या सिनेचाहत्यांनी अमर कौशिक-दिग्दर्शित हॉरर कॉमेडी सिनेमा चित्रपटगृहांमध्ये पाहिला असेल त्यांना हा टीझर मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळालीय. चित्रपटातील विकी कौशलच्या नव्या अवताराचे अनेकांनी आधीच कौतुक केले आहे.

विकी कौशलने 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१५ 'मसान' चित्रपट केला. या चित्रपटामुळे विकी कौशलने खूप लोकप्रियता मिळवली. पुढे 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', 'जुबान', 'मनमर्जियां', 'संजू' अश्या चित्रपटात काम केलं. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी विकीला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलय.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT