Rashmika and vicky Google
मनोरंजन बातम्या

Chhaava Trailer Launch: जखमी रश्मिकाची विकी कौशलने केली मदत; चाहते पडले प्रेमात, व्हिडीओ व्हायरल

Chhaava Trailer Launch: २०२५ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'छावा' या चित्रपटाच्या आजच्या ट्रेलर लाँचमध्ये रश्मिका मंदान्ना जखमी पायासह पोहोचली होती.

Shruti Vilas Kadam

Chhaava Trailer Launch: २०२५ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'छावा' या चित्रपटाचा आज ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाच्या ट्रेलरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. चाहते विकी कौशलच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका बघून खुश आहेत आणि रश्मिकाच्या लूकवरही ते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

छावा चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी रश्मिका मंदाना खास जखमी पायाने आली होती पण विकीने तिच्यासाठी केलेल्या सहकार्यपाहून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत. विकीने तिचा हात धरला आणि तिला खुर्चीवर बसण्यास मदत केली आणि ती व्यवस्थित बसली आहे याची खात्री केली. लाँचचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत परंतु छावा अभिनेत्याचे हे हेल्पिग नेचरपासून सर्वाना आनंद झाला आहे.

रश्मिकाची मदत केल्यामुळे चाहते सोशल मीडियावर विकीच्या कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अनेक जण त्याला 'जेंटलमॅन' म्हणत आहेत. तर काही नेटकरी त्याच्यासाठी हार्टच्या ईमोजीचा वर्षाव करत आहेत. आज सकाळी , रश्मिका हैदराबाद विमानतळावर व्हीलचेअरवर टोपी आणि फेस मास्क घालून दिसली. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीला पायाला दुखापत झाली होती आणि सध्या तिला चालत येत नाही आहे.

छावा

मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या मराठी कादंबरीवर आधारित आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत तयार केला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. तर, अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT