Chhaava BTS Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhaava BTS: 'रोज माझ्या शरीरात नवीन जखमा...'; असा घडला 'छावा', विकीने सांगितली इनसाइड स्टोरी, व्हिडीओ व्हायरल

Chhaava BTS Story: 'छावा'च्या निर्मात्यांनी एक खास व्हिडिओ रिलीज केला आहे. यामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत पाहायला मिळत आहे.

Shruti Vilas Kadam

Chhaava BTS: चित्रपट खरोखर कधी यशस्वी होतो हे तुम्हाला माहिती आहे का? बहुतेकदा, प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या सोमवारी मिळालेल्या कमाईवरून तो चित्रपट प्रेक्षकांना आवडला की नाही हे ठरले जाते. लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' हा चित्रपट, ज्याचे मुख्य आकर्षण विकी कौशल आणि रश्मिका मंदाना होते, त्याने सोमवारी तब्बल २४ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाची इतकी क्रेझ आहे की चित्रपटगृहांमध्ये चित्रपटासाठी मोठ्याने जयजयकार करताना आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या शेवटच्या भागात लोक अश्रू ढाळतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

आता निर्मात्यांनी आता एक खास व्हिडिओ रिलीज केला आहे यामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना घेतलेली मेहनत पाहायला मिळत आहे. 'द मेकिंग ऑफ अ वॉरियर किंग' असे शीर्षक या व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये विकी सहा महिन्यांच्या तयारीबद्दल, घोडेस्वारीसाठी आणि शस्त्रे हाताळण्यासाठी घेतलेल्या तासनतासांच्या सरावाबद्दल बोलत आहे.

या व्हिडिओत विकी म्हणाला, "मला घोडेस्वारीचे कठोर प्रशिक्षण आणि शस्त्रांचे व्यापक प्रशिक्षण मिळाले. आम्ही लाठी, तलवारी आणि भाल्यांचे प्रशिक्षणही घेतले. प्रत्येक दिवशी आम्हाला ६-८ तासांचे प्रशिक्षण मिळाले. दररोज रात्री मला घरी जाताना माझ्या शरीरात नवीन जखमा दिसत होत्या. पण, या प्रशिक्षणामुळे त्याला त्याच्या आयुष्यात शिस्त शिकलो.

या उपक्रमांव्यतिरिक्त, त्याला संभाजी महाराजांच्या भूमिकेत शारीरिकदृष्ट्याही पहावे लागले. "एक गोष्ट निश्चित होती... मला खूप वजन वाढवावे लागले. मला मसल पूल करावे लागले. शेवटी विकीची ही मेहनत फळास आली आणि त्याने प्रेक्षकांच्या मत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका फक्त साकारली नसून ती जगल्याचे मोठ्या पडद्यावर दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT