Chhaava Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection: 'छावा'नं 'कल्की : २८९८ एडी'ला टाकलं मागे, लवकरच पार करणार ५०० कोटींचा टप्पा

Chhaava Box Office Collection Day 19 : विकी कौशलचा 'छावा' लवकरच ५०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांच्या 'कल्की : २८९८ एडी' चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava ) चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने 19 दिवसांत मोठे यश संपादन केले आहे. 'छावा'चे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून चित्रपटातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (Akshaye Khanna) झळकला आहे. 'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 19

  • 'छावा' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 32 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 21.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 23 कोटी रुपये

  • नववा दिवस - 45 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 40 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 19.10 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये

  • तेरावा दिवस - 21.75 कोटी रुपये

  • चौदावा दिवस- 12 कोटी रुपये

  • पंधरावा दिवस - 400 कोटींचा टप्पा पार

  • सोळावा दिवस - 21 कोटी रुपये

  • सतरावा दिवस - 25 कोटी रुपये

  • अठरावा दिवस - 8.50 कोटी रुपये

  • एकोणिसावा दिवस - 5.50 कोटी रुपये

  • एकूण - 472.00 कोटी रुपये

आतापर्यंत 'छावा' बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. जगभरात 600 कोटींचा टप्पा चित्रपटाने पार केला आहे. तर आता बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लवकरच 500 कोटींचा टप्पा 'छावा' पार करणार आहे.

'कल्की : २८९८ एडी'ला टाकलं मागे

'छावा'ने आजवर कलेक्शनमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. यात 'पुष्पा 2', 'स्त्री 2', 'बाहुबली 2' यांना मागे टाकले आहे. यात आता बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांच्या 'कल्की : २८९८ एडी' चा (Kalki 2898 AD) देखील समावेश झाला आहे. 'छावा'ने 19 व्या दिवशी 'कल्की : २८९८ एडी'ला टाकलं मागे टाकले आहे. 'छावा'ने 19 व्या दिवशी 5.50 कोटी रुपयांची कमाई केली आहेत. तर 'कल्की : २८९८ एडी'ने 19 व्या दिवशी फक्त ४ कोटींची कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Pathology lab reports: रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर प्रत्यक्षात तपासणी करतात का? ‘घोस्ट पॅथॉलॉजिस्ट’ प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT