Akshay-Shilpa : 'चुरा के दिल मेरा...' अक्षय अन् शिल्पाचा जलवा, एव्हरग्रीन गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Akshay Kumar-Shilpa Shetty Dance Video : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांचा जबरदस्त डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
Akshay Kumar-Shilpa Shetty Dance Video
Akshay-ShilpaSAAM TV
Published On

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty ) यांची जोडी खूप हिट ठरली आहे. यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. सध्या यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी एव्हरग्रीन गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अक्षय आणि शिल्पा यांची चित्रपटातील केमिस्ट्री आणि खऱ्या आयुष्यातील मैत्री दोन्ही गोष्टी खूपच भारी आहेत.

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी नुकतेच 'एचटी इंडियाज मोस्ट स्टायलिश अवार्ड 2025' एकत्र स्पॉट झाले. तेव्हा यांनी आपल्या चित्रपटातील आयकॉनिक गाणे 'चुरा के दिल मेरा'वर (Chura Ke Dil Mera) भन्नाट डान्स केला आहे. डान्स करताना अक्षय कुमारमध्ये खूपच उत्साह पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी 90चे दशक गाजवले आहे. 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपटातील 'चुरा के दिल मेरा' हे गाणे आहे.

तब्बल 30 वर्षे नंतरही या जोडीमधील केमिस्ट्री खूपच कमाल आहे. त्यांनी स्टेजवर धुमाकूळ घातला आहे. त्यांनी 'चुरा के दिल मेरा' गाण्याची हुक स्टेप केली आहे. सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या एनर्जी आणि बॉन्डिंगचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. या डान्स व्हिडीओवर चाहते आपल्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अक्षय- शिल्पा लूक

'एचटी इंडियाज मोस्ट स्टायलिश अवार्ड 2025' साठी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी खूप खास लूक केला होता. अक्षय कुमार पांढऱ्या रंगाचा फॉर्मल्स सूट परिधान केला होता. तर शिल्पा शेट्टीने पांढऱ्या रंगाचा सुरेख साडी नेसली होती. तिने पांढऱ्या रंगाचा छान बॅकलेस ब्लाउज साडीसोबत कॅरी केला होता. या लूकमध्ये जणू परी दिसत होती.

Akshay Kumar-Shilpa Shetty Dance Video
Amruta Khanvilkar : बाबो! चंद्रा करणार आयटम साँग, 'चिऊताई' गाण्याची पहिली झलक पाहिलीत का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com