Rajinikanth Jailer Look Twitter
मनोरंजन बातम्या

Rajinikanth Movie Announcement : रजनीकांतचा नादच खुळा... 'जेलर' बघण्यासाठी चेन्नई-बंगळुरूमधील कंपन्यांना सुट्टी

Pooja Dange

Office Are Closed On Jailer Released : सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. रजनीकांतचा चित्रपट म्हणजे बॉक्स ऑफिसवर कल्ला होणारच. जवळपास २ वर्षांनी रजनीकांत मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. रजनीकांतचा चित्रपट फॅन्ससाठी मेजवानी असणार आहे. तर त्याच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

चेन्नई आणि बेंगळुरू येथील कंपन्यांनी १० ऑगस्टला त्यांच्या कामगारांना सुट्टी जाहीर कलेची आहे. प्रोमोमुळे या चित्रपटाने आधीच खळबळ उडाली आहे. सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' फिव्हर न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर देखील पाहायला मिळालं. 'जेलर'ला चांगला स्क्रीन प्रेझेन्स मिळेल अशी अपेक्षा आहे, ही रजनीकांतसाठी चांगली सुरुवात असेल.

जेलर हा चित्रपट परदेशातही चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे. वेंकी रिव्ह्यूजच्या मते, 'जेलर' 2023 मध्ये भारतीय चित्रपटासाठी सर्वाधिक प्रीमियर्स रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर आहे. परदेशात 10 कोटी रुपयांच्या ऍडव्हान्स बुकिंगचा टप्पा या चित्रपटाने ओलांडला आहे.

'जेलर' हा नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित अॅक्शन पॅक्ड चित्रपट आहे, ज्यामध्ये रजनीकांत एक निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून दिसत आहेत. दिग्दर्शकाने संपूर्ण चित्रपटात भावनांचे जाळे यशस्वीपणे विणले आहे, असे म्हटले जात आहे. (Latest Entertainment News)

याआधी रिलीज झालेल्या प्रोमो रजनीकांतचे पात्र 'टायगर' मुथुवेल पांडियन दोन वेगवेगळ्या अवतारांमध्ये सादर करण्यात आले होते. या चित्रपटात सुपरस्टार एका पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. एक सामान्य माणूस तलवारी आणि बंदुकांच्या सहाय्याने वाईट लोकांशी कसा लढतो हे देखील व्हिडिओमध्ये दिसणार आहे.

या चित्रपटात प्रियांका मोहन, शिवा राजकुमार, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी, विनायकन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मल्याळम अभिनेते मोहनलाल यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT