Amruta Khanvilkar In Khupte Tithe Gupte Instagram
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar In Khupte Tithe Gupte: आदिनाथ नव्हे.. दौलतरावच्या भूमिकेत पाहिजे होता ‘हा’ अभिनेता.. चंद्रमुखीमधल्या चंद्राचा मोठा खुलासा..

Khupte Tithe Gupte Latest Episode Teaser: येत्या एपिसोडमध्ये अमृता खानविलकर येणार असल्याने ती कोणकोणत्या प्रश्नांवर उत्तरं देणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

Chetan Bodke

Khupte Tithe Gupte Latest Episode Promo

झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा होत आहे. राज्यातील महत्वाचे राजकीय मंडळी, सोबतच अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावली होती. कायमच आपल्या खुमासदार शैलीमध्ये प्रश्न विचारण्यासाठी गायक अवधुत गुप्ते प्रसिद्धीझोतात असतो. सध्या या खुपणाऱ्या शोमुळे गायक आणि संगीतकार अवधुत गुप्ते बराच चर्चेत आहे. येत्या रविवारी अर्थात ३ सप्टेंबरला ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये चंद्रा फेम आणि अवघ्या महाराष्ट्रात चंद्रमुखी म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता खानविलकर प्रमुख पाहुणी म्हणून येणार आहे.

अवधुत गुप्ते होस्ट करत असलेल्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आले आहेत. अशातच येत्या एपिसोडमध्ये अमृता खानविलकर येणार असल्याने ती कोणकोणत्या प्रश्नांवर उत्तरं देणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. सध्या सोशल मीडियावर शोचा टीझर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अवधूत गुप्ते अमृताला प्रसाद ओकचा फोटो दाखवत तिला उत्तर द्यायला सांगतो. अमृता म्हणते, “मला आजही असं वाटतं की, दौलत देशमाने हे पात्र त्यानेच (प्रसाद ओक) साकारायला हवं होतं”, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. अमृताची ही प्रतिक्रिया ऐकून अवधूत गुप्तेसह प्रेक्षकांनाही धक्का बसलाय.

पुढे अवधुत गुप्ते म्हणाला, 'पण तुला भिती वाटत नाही का?, खरं देशमाने हे पात्र ज्यांनी साकारलंय (आदिनाथ कोठारे) त्यांनी हे ऐकल्यानंतर त्यांना वाईट वाटेल असं तुला वाटत नाही का?' असा अवधूत गुप्तेने चंद्राला अर्थात अमृताला हा प्रश्न केला आहे. आता अमृता अवधूत गुप्तेच्या या प्रश्नावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेय. झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून शेअर करताना त्यांनी 'धारदार प्रश्नांना बिनधास्त आणि स्पष्ट उत्तरं द्यायला येतेय अभिनेत्री अमृता खानविलकर..!' असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला.

अमृता खानविलकरचा हा एपिसोड येत्या ३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून प्रेक्षक या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत. चंद्रमुखी चित्रपट २०२२ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटामध्ये चंद्राचे पात्र अमृताने तर खासदार दौलतराव देशमानेंचं पात्र अभिनेता आदिनाथ कोठारेने साकरलं होतं. या चित्रपटामुळे अमृताला खूपच प्रसिद्धी मिळाली असून चंद्रा या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपटाची कथा विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' कादंबरीवर आधारित असून चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं होतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गेमझोनच्या नावाखाली चालायचे भलतेच प्रकार; प्रायव्हेट रुममधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा कौल कोणाला? भाऊ, भाई की दादाला?

महिंद्राची जबरदस्त Formula E -कार बाजारात; रेसिंग ट्रॅकवर धुरळा उडवणार

Maharashtra Live News Update: अकोला स्थानिक स्वराज निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह

अहंकारी रावणाची लंका खाक झाली, अहंकाराच्या लंकेवरुन शिंदे-फडणवीस भिडले

SCROLL FOR NEXT