Cham Cham Paus Marathi Song:  Saam tv
मनोरंजन बातम्या

Cham Cham Paus Marathi Song: आर्टिफिशियल पावसात शूट झालेलं 'छम छम पाऊस' गाणं चर्चेत

Cham Cham Paus Marathi Song: अभिनेत्री 'अंकिता राऊत' आणि टक्सीडो फेम अभिनेता 'हरिश वांगीकर' यांचं नवं गाणं नुकतेच प्रदर्शित झालं आहे. '

Vishal Gangurde

cham cham paus New Marathi Song:

अभिनेत्री 'अंकिता राऊत' आणि टक्सीडो फेम अभिनेता 'हरिश वांगीकर' यांचं नवं गाणं नुकतेच प्रदर्शित झालं आहे. 'छम छम पाऊस' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचे संगीतकार, गीतकार आणि गायक हरिश वांगीकर आहेत. तर गाण्याचे संगीत संयोजक मॅक्सवेल फर्नांडीस आहे. आर्टिफिशियल पावसात 'छम छम पाऊस' या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

या नव्या गाण्याविषयी अभिनेता हरिश वांगीकर म्हणाला की, 'मी एकदा पाऊस बघत बघत गाणी ऐकत होतो. तेवढ्यात माझ्या प्लेलिस्टमध्ये एक गरब्याचं गाणं सुरू झालं. मला हे गाणं सुचलं. 'छम छम पाऊस' हे पावसावरील रोमँटिक गाणं आहे. या गाण्याचं संगीत गरबा फॉर्ममध्ये आहे. तर या गाण्याचे बोल मराठी आहेत'.

'माझा मित्र अविनाश पायाळ याने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. अविनाश आणि अंकितासोबत रिअर्सल करताना खूप धमाल आली. चित्रीकरण करताना पावसात भिजून भिजून फार थंडी वाजत होती. या गाण्याला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळत आहे. ते पाहून खूप आनंद होत आहे. तसेच मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार, असे तो पुढे म्हणाला.

अभिनेत्री अंकिता राऊत म्हणाली,' या गाण्याचं चित्रिकरण पहाटेचं होतं. त्यावेळी पाऊस आला होता. त्यानंतर पाऊसच पडला नाही. त्यामुळे आम्ही आर्टिफिशियल पावसात संपूर्ण गाण्याचं चित्रिकरण केलं. आर्टिफिशियल पाऊस पडताना दाखवणं सोप्पं नाही'.

'चित्रीकरणादरम्यान, माझ्या नाकातोंडात पाणी गेलं. त्यामुळे भयानक थंडी वाजत होती. त्यामुळे थोडा ब्रेक घ्यावा लागला होता. चित्रिकरणावेळी अचानक लाईट सुद्धा गेली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी चित्रिकरण करण्यात आलं. गाण्याचं चित्रिकरण करताना खूप मजा आली, अंकिता पुढे म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti : ...तर आम्ही आम्ही स्वतंत्र लढू, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Horoscope: घरच्या जबाबदारीचा भार; काहींच्या आयुष्यात येणार नवीन व्यक्ती, जाणून घ्या तुमच्यात भविष्यात घडणार काय?

IND vs WI: 'आय लव्ह यू शुभमन', मिस्ट्री गर्लने लाईव्ह मॅचमध्ये केला शुभमन गिलला प्रपोज, फोटो व्हायरल

Maharashtra Live News Update : भरत गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात तटकरेंच्या हस्ते राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Poha Chivda Recipe : दिवाळीला पातळ पोह्यांचा बनवा कुरकुरीत चिवडा, महिनाभर राहील फ्रेश

SCROLL FOR NEXT