Bhau Kadam Saam tv
मनोरंजन बातम्या

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

Bhau Kadam: चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांनी त्यांच्या प्रेमकथेचा खुलासा केला आहे. एकांकिकेतून सुरू झालेली ही साधी पण इमोशनल लव्हस्टोरी एका फिल्मी लव्हस्टोरी पेक्षा कमी नाही.

Shruti Vilas Kadam

Bhau Kadam: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय विनोदी अभिनेता भाऊ कदम सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या गाजलेल्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या भाऊ कदम यांनी नुकतीच त्यांच्या प्रेमकथेचा खुलासा केला असून, त्यांची ही साधी पण इमोशनल लव्हस्टोरीने चाहत्यांना फार आवडली आहे.

सागर खापरेच्या पॉडकास्टमध्ये भाऊ कदम यांनी सांगितले की, आमच्या प्रेमाची सुरुवात अगदी वेगळ्या पद्धतीने झाली. माझं लव्हमॅरेज आहे. माझ्या बायकोची बहीण आमच्या एकांकिकेत काम करायची. आमचा संपूर्ण ग्रुप एकदा त्यांच्या घरी गेला होता, मी सुद्धा त्यांच्याबरोबर गेलो होतो. हळुहळू माझं जाणं-येणं वाढलं. ममताची आणि माझी ओळख आणि भेट तिथेच झाली. ममता घरातील मोठी बहीण होती.आमचं हळूहळू छान जुळलं. आम्ही एकमेकांना ओळखून घेतलं. 

भाऊ कदम पुढे म्हणाले, 'मग एकदिवस मी मनातल्या भावना कबूल करायचं ठरवलं. 'हो' म्हणाली तर चांगलंच आहे, असा विचार माझ्या मनात होता आणि खरंच ती हो म्हणाली. तिने माझं घर आणि परिस्थिती बघितली नव्हती. त्याआधीच तिने होकार दिला आणि मग आमचं लग्न झालं.' 

आज भाऊ कदम हे मराठी इंडस्ट्रीतील एक यशस्वी नाव असले तरी त्यांच्या आयुष्यातील ही प्रेमकहाणी त्यांच्या साध्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवते. त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’ सह त्यांनी 'पांडू', 'टाईमपास', 'इन्स्पेक्टर झेंडे' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : अडचणीतून सहज सुटाल, ५ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Influencer Arrested: व्ह्यूजसाठी प्रसिद्ध युट्यूबचं महिलांसोबत धक्कादायक कृत्य; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा

Maharashtra News Live Update: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कोकणकन्या एक्सप्रेस ९ तासांचा विलंब

Chalisgaon Tourist Hidden: चाळीसगावजवळ लपलेली Top 5 पर्यटनस्थळे, एका दिवसात फिरून या

Kudal Tourism : पावसाळ्यात कोकणात गेल्यावर 'कुडाळ' हे ठिकाण नक्की फिरा, पाहा ५ निसर्गरम्य पर्यटन स्थळे

SCROLL FOR NEXT