Chala Hawa Yeu Dya 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chala Hawa Yeu Dya 2 : 'चला हवा येऊ द्या २'मधून निलेश साबळेची एक्झिट, तर 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री

Chala Hawa Yeu Dya 2 Host : 'चला हवा येऊ द्या 2' शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन कोण करणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठी कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) आता पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोनं अवघ्या जगाला खळखळवून हसवले आहे. या शोमधील कलाकारांनी आपल्या कॉमेडी अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केली आहे. शोमधील स्त्री पात्र तर खूप गाजली आहेत. आता या शो बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

'चला हवा येऊ द्या' शोमध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके यांनी प्रेक्षकांना खूप हसवले. आजही प्रेक्षक जुने भाग आवर्जून पाहतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश साबळेने (Nilesh Sable) केले होते. मात्र आता 'चला हवा येऊ द्या 2'मध्ये शोचे सूत्रसंचालन कोण करणार यासंबंधित चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तेव्हा मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या'चा नवीन सीझन निलेश साबळे होस्ट करणार नसून या ठिकाणी मराठमोळा अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'चला हवा येऊ द्या' शोचे सूत्रसंचालन 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) करणार आहे. आजवर अभिनयासोबत अभिजीतने अनेक शोचे सूत्रसंचालन केले आहे. 'चला हवा येऊ द्या' हा 'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय शो आहे. गेल्या 10 वर्षांपासून या शोने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवले आहे.

अभिजीत खांडकेकर वर्कफ्रंट

अभिजीत खांडकेकरने आजवर अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. त्याची 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका खूप गाजली आहे. त्याने वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेला देखील चाहत्यांनी खूप पसंती दिली. आता 'चला हवा येऊ द्या'चे सेटवर अभिजीत खांडकेकर कसा धुमाकूळ घालतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

SCROLL FOR NEXT