Celebrity At NMACC Launch In Mumbai: मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शुक्रवारी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) चे उद्घाटन झाले. देशातील आणि जगातील हे पहिले केंद्र आहे जिथे प्रत्येक घटकातील कलाकारांना त्यांची कला दाखवता येणार आहे. उद्घाटन सोहळ्याला कलावंत, धार्मिक गुरू, क्रीडा आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांनी उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते.
चित्रपट अभिनेते अनुपम खेर, कैलाश खेर, आमिर खान, शाहिद कपूर, अभिनव बिंद्रा, प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, गीतकार प्रसून जोशी, जावेद अख्तर आणि शबाना आझमी उपस्थित होते.
क्रिकेटर महेला जयवर्धने, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव, प्रेरक गुरु गौर गोपाल दास, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती आणि इतर अनेक सेलिब्रिटी हजेरी लावली होती.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर ग्लोबल म्युझियम स्टँडर्ड अंतर्गत तयार करण्यात आले आहे. येथे, भारत आणि जगभरातील कलात्मक प्रदर्शनांचे जतन केले जाईल. हे सांस्कृतिक केंद्र हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे. यात डायमंड बॉक्स, स्टुडिओ थिएटर, आर्ट हाऊस आणि कला दालन अशा अनेक गोष्टी आहेत.
प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी हे सांस्कृतिक केंद्र खास तयार करण्यात आले आहे. ग्रँड थिएटरमधील प्रत्येक गोष्ट मनाला भुरळ पडेल कारण त्यात एकात्मिक डॉल्बी अॅटमॉस सराउंड साउंड सिस्टम आणि व्हर्च्युअल साउंड सिस्टम आहे.
'द ग्रेट इंडियन म्युझिकल - सिव्हिलायझेशन टू नेशन' हा शो 3 एप्रिल रोजी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. या शोचे तिकीट 400 रुपये असेल. तर 3 एप्रिल ते 4 जून दरम्यान होणाऱ्या इंडिया इन फॅशन शोचे तिकीट दर 199 रुपये असतील. याशिवाय ३ एप्रिल ते ४ जून या कालावधीत होणाऱ्या संगम/कॉन्फ्लूएंस तिकीटही १९९ रुपये असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.