CBI Files Complaint Against Film Producer Saam TV
मनोरंजन बातम्या

CBI Files Complaint Against Film Producer: बापरे! 119 कोटींची फसवणूक; बॉलिवूड निर्मात्यावर गुन्हा दाखल

Bollywood Producer: बँक फसवणुकी प्रकरणी सीबीआयने चित्रपट निर्माता जसप्रीत सिंगवर गुन्हा दाखल केला आहे.

Pooja Dange

सचिन गाड

Bollywood Producer 119 Crore Fraud: बॉलिवूड चित्रपट निर्मात्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयडीबीआय बँकेला 119 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान करणाऱ्या कथित बँक फसवणुकी प्रकरणी सीबीआयने चित्रपट निर्माता जसप्रीत सिंग वालिया उर्फ बंटी वालिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बँकेने त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, GS Entertainment Private Limited (GSEPL) यांनी वालिया आणि इतरांच्या वैयक्तिक हमीवर संजय दत्त, बिपाशा बसू स्टारर हिंदी चित्रपट "लम्हा"च्या निर्मितीसाठी चित्रपट वित्तपुरवठा योजनेअंतर्गत 2008 हे कर्ज घेतले होते.

GSEPL वर फसवणूक, रेकॉर्डमध्ये फेरफार, सार्वजनिक निधीचा गैरवापर, चुकीचे वर्णन आणि विश्वासाचा गुन्हेगारी उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे हे कर्ज फसवणूक म्हणून घोषित करण्यात आले. (Latest Entertainment News)

वालिया, जीएसईपीएल आणि इतरांची नावे घेत भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलमांतर्गत गुन्हेगारी कट, फसवणूक आणि खोट्या नोंदी असे आरोप करत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बँकेने दावा केला आहे की संजय दत्त आणि बिपाशा बसू स्टारर लम्हे चित्रपट 2009 मध्ये रिलीज करण्याची योजना होती, परंतु प्रवर्तक आणि प्रदर्शकांमधील वादामुळे त्याचे प्रदर्शन रखडले. यानंतर, 30 सप्टेंबर 2009 रोजी, हे खाते देखील एक नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता बनले.

बँकेने GSEPL, PVR आणि खाजगी बँक यांच्यातील त्रिपक्षीय करारावर तोडगा काढत चित्रपटाच्या जगभरात प्रदर्शित होण्यासाठी PVR ची वितरक म्हणून नियुक्ती केली. तसेच PVR कडून वचनबद्धता घेतली की पोस्ट-प्रॉडक्शन कामासाठी 8 कोटी रुपये त्यांनी गुंतवलेत.

आता बँकेचा आरोप आहे की PVR आपल्या वचनबद्धतेचे पालन करण्यात अपयशी ठरले आहे. त्यांचे सुमारे 83.89 लाख रुपयांचे नुकसान झाले. कारण कंपनीचे एकूण उत्पन्न केवळ 7.41 कोटी रुपये होते, तर कंपनीने जाहिरात आणि वितरणावर 8.25 कोटी रुपये खर्च केले होते.

बँकेने आरोप केला आहे की फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झाले की कंपनीने 'बनावट वापर प्रमाणपत्र' सादर केले, बँकेचा निधी वळवला आणि खाते पुस्तकांमध्ये फेरफार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

SCROLL FOR NEXT