Upcoming Marathi Movie Gadkari Trailer Out Instagram
मनोरंजन बातम्या

Gadkari Film Trailer Out: ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’चा ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’ जीवनप्रवास उलगडणार, ‘गडकरी’चा ट्रेलर प्रदर्शित

Nitin Gadkari Biopic Trailer Released: ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या बायोपिकचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला आहे.

Chetan Bodke

Upcoming Marathi Movie Gadkari Trailer Out

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांचा जीवनपट येत्या २७ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या गडकरी यांच्या बायोपिकची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा नागपूरमध्ये दिमाखात पार पडला. चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचिंग सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडाने ‘गडकरी’ शैलीने उपस्थितांचे मने जिंकली.

अभिजीत मजुमदार आणि ए एम सिनेमा प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी करीत आहेत. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांचे पात्र राहुल चोपडा यांनी साकारलेय. त्यासोबतच चित्रपटामध्ये ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनुराग भुसारी यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे सहनिर्माते अनुराग भुसारी आणि मिहिर फाटे आहेत.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’ अशी जर्नी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितीन गडकरी यांचा हा प्रवास फारच खडतर होता. त्यांच्या जीवनप्रवासामध्ये अनेक चढ उतार आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहे. नितीन गडकरींच्या ह्या बायोपिकमधून प्रेक्षकांना राजकीय आणि खासगी आयुष्य पाहायला मिळेल. ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे’ असे मानणाऱ्या ‘गडकरी’ यांचा असामान्य प्रवास २७ ॲाक्टोबरपासून प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे.

“सर्वांसाठी महत्वाची बाब अशी की, नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिजीत मजुमदार, दिग्दर्शक अनुराग भुसारी, अक्षय देशमुख आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नितीनजींचे आयुष्य आपल्या समोर आणले आहे. त्यामुळे त्यांच्या टीमला आणि कलाकारांना मनापासून आभार मानतो. एक सुंदर चित्रपट तुम्ही तयार केला. ट्रेलर पाहून आमच्या सगळ्यांच्याच मनात हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आहे. नितीनजींच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे हे तीन तासांमध्ये बांधणे कठीण आहे. नितीन गडकरी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचे आयुष्य एका भागात दाखवणे शक्य नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की याचा दुसरा भागही लवकरच प्रदर्शित व्हावा.” असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी यांनी सांगितले की, “दूरदृष्टीचा विचार करून सदैव कार्यरत असणाऱ्या नितीन गडकरी यांचे देशकार्य, समाजकार्य आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यांची व्यावसायिक कारकिर्द जितकी कौतुकास्पद आहे तितकेच रंजक त्यांचे वैयक्तिक आयुष्यही आहे. नितीन गडकरी आपल्या देशाला प्रगतीपथावर नेत असतानाच त्यांच्या पत्नीने म्हणजेच कांचनताईंनी त्यांच्या घराचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळला. गडकरींच्या या यशामध्ये त्यांच्या पत्नींनी फार महत्वाची साथ दिली. त्यासोबतच त्यांच्या मित्रांनीही तितकीच महत्वाची साथ दिली. चित्रपटामध्ये नितीन गडकरी यांचा एक सामान्य मुलगा ते यशस्वी राजकारणी असा प्रवास या बायोपिकमध्ये दाखवण्यात येणार आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT