Jhume Jo Pathaan Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viral Video: शाहरुखच्या 'पठान' मधील गाण्यावर BTS आर्मीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

कोरियनच्या प्रसिद्ध बीटीएस आर्मी या ग्रुपने गाण्यावर एक जबरदस्त डान्स करत व्हिडिओ शेअर केला आहे.

Chetan Bodke

Jhume Jo Pathaan Viral Video: सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठान' हा चित्रपट जगभरात प्रचंड कमाई करत आहे. तर दुसरीकडे त्याच्या 'झूम जो पठान' या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. आता कोरियनच्या प्रसिद्ध बीटीएस आर्मी या ग्रुपने गाण्यावर एक जबरदस्त डान्स करत व्हिडिओ शेअर केला आहे, त्यांच्या हूक स्टेप्स पाहून नक्कीच तुम्ही ही नक्कीच थिरकाल.

बीटीएस आर्मीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये यातील सर्व सदस्य 'झूम जो पठान' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांनी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या डान्स स्टेप्सची एकही कॉपी केलेली नाही. पण त्यांच्या किलर मूव्ह्सने सर्वांचेच मन जिंकले आहे. त्यांच्या या अनोख्या हूक स्टेप्सने सर्वांचेच मन जिंकले आहे. हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत असून चाहत्यांनी व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बीटीएस आर्मीच्या या व्हिडीओवर युजर कमेंट करत म्हणतात, 'ओरिजिनलपेक्षा खूपच सुंदर' दुसर्‍याने लिहिले, 'मूळ कोरिओग्राफीपेक्षा खूप चांगले'. तर आणखी एक युजर म्हणतो, 'मूळ खूपच कंटाळवाणा होता, परंतु बीटीएसने उत्कृष्ट नृत्य केले आहे' अशी टिप्पणी केली.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'झूम जो पठान' हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून बरेच चर्चेत आहे. नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर रील बनवली. आतापर्यंत जगभरात चित्रपटाने ९७५ कोटींची कमाई केली आहे. लवकरच शाहरुखचा 'पठान' १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होत आहे. 'पठान'ने कमाईत काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' आणि आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार'लाही मागे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगाय गंभीर जखमी

मुंबईत भीक मागत फिरणारा ‘भावी डॉक्टर’ पोलिसांमुळे पुन्हा कुटुंबाच्या कुशीत

संतापजनक! रात्री रस्त्यावर अर्धनग्न फिरत होता तरूण; फुटपाथवरील भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार, सीसीटीव्हीत घटना कैद

Mouth Cancer: सिगारेट न ओढणाऱ्यांमध्येही वाढतोय तोंडाचा कॅन्सर; तरूणांनी या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करूच नये

Rukmini Vasanth Video: प्रसिद्ध अभिनेत्रीचा बिकिनीतील 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; व्हिडिओचं सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT