Brahmastra Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brahmastra OTT Release : ब्रह्मास्त्र येणार प्रेक्षनकांच्या भेटीला, वाचा कधी, केव्हा आणि कुठे?

आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ब्रह्मास्त्र प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Brahmastra OTT Release News: स्टार स्टुडिओ आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित, 'ब्रह्मास्त्र भाग एक' या चित्रपटांमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर यांच्यासह बॉलीवूडचे दिग्गज कलाकार दिसत आहेत. दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाला अधिक दर्जेदार बनविण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. या वर्षाचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ब्रह्मास्त्र डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ब्रह्मास्त्र पाहण्याची प्रेक्षकांसाठी ही दुसरी संधी आहे. प्रेक्षक आता हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतून त्यांच्या पसंतीची भाषा निवडून ओटीटीवर हा चित्रपट पाहू शकणार आहे.

अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी आणि रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांसारख्या भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांवर चित्रित झालेला हा चित्रपट दमदार आहे. इतक्या कलाकार एका चित्रपटात याआधी कधीच दिसले नव्हते. ज्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणे जमले नाही त्यांच्यासाठी डिजिटल प्रीमियरची एक खास संधी आहे.

गौरव बॅनर्जी, हेड ऑफ कंटेंट, म्हणतात की, "डिज्नी प्लस हॉटस्टार हे सुपरहिरोचे घर आहे आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर अतुलनीय आशयाचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे! ब्रह्मास्त्र हा या वर्षातील ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपट आहे आणि आम्ही या नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांसाठी तो प्रदर्शित करणार आहोत, हा एक अतिशय रोमांचित क्षण आहे. मी आता थांबू शकत नाही." (Movie)

दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी ओटीटी जगतातील चित्रपटाच्या नव्या प्रवासाविषयी माहिती देताना सांगितात की, "ब्रह्मास्त्रला प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रवास अतिशय मनोरंजक आणि आव्हानात्मक होता आणि जगभरातील प्रेक्षकांचा मी खरोखरच आभारी आहे ज्यांनी या चित्रपटाला स्वीकारले आहे. त्यांच्या अपार प्रेम आणि पाठिंब्यामुळे हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." (OTT)

Ranbir Kapoor Alia Photo During Brahmastra

'ब्रह्मास्त्र चित्रपटाचा माझ्यासाठी खूप खास प्रवास होता. अयानने ज्या प्रकारे भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवे विश्व निर्माण केले आहे, हा अनुभव आयुष्यभर माझ्यासोबत राहील. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम मिळत आहे. आता डिज्नी प्लस हॉटस्टार या भारतातील सर्वात मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करून, चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांपर्यंत नेण्याचे आमचे ध्येय आहे, असे अभिनेता रणबीर कपूर याने चित्रपटाविषयी सांगताना म्हटले आहे. (Ranbir Kapoor)

अभिनेत्री आलिया भट्ट सुद्दा तिच्या भावना व्यक्त करत म्हणाली, "ब्रह्मास्त्र हा माझ्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी खूप खास आणि जवळचा चित्रपट आहे. एक कलाकार या नात्याने, अशा भव्य दृष्टीचा एक भाग असल्याचा मला सन्मान वाटतो. हा चित्रपट जगभरातील एका उत्सवापेक्षा कमी नाही आणि आम्ही ४ नोव्हेंबर २०२२ रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करणार असून याचा आम्हाला आनंद होत आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT