Ranbir Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor : निर्माता अयान मुखर्जीला पितृशोक; रणबीर कपूरने दिला मित्राच्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा, पाहा PHOTO

Deb Mukerji Death: अयान मुखर्जीच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. आलियाचे बर्थडे सेलिब्रेशन सोडून आलिया आणि रणबीर मुंबईला परतले.

Shreya Maskar

देशभरात धुलीवंदनाचा उत्साह असताना मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या (Ayan Mukerji) कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अयान मुखर्जीचे वडील अभिनेते देब मुखर्जी यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८३व्या वर्षी देब मुखर्जी (Deb Mukerji) यांनी अखेरचा श्वास घेतल आहे. यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींनी अयान मुखर्जीच्या घरी धाव घेतली आहे. अयान मुखर्जीचे जवळचे मित्र रणबीर कपूर आणि आलिया भट्टही आलिबागहून मुंबईत परतले आहेत.

आज (15 मार्च) आलिया भट्टचा वाढदिवस आहे. आलिया (Alia Bhatt) आता 32 वर्षांची झाली आहे. रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) खूप थाटात आलियाचे प्री बर्थडे सेलिब्रेशन केले. आलियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रणबीर आणि आलिया आलिबागला गेले होते. मात्र अयानच्या वडीलांच्या निधनाची बातमी ऐकताच ते पुन्हा मुंबईत आले.

अयान मुखर्जीच्या वडीलांचे निधन 14 मार्चला झाले. मुंबईला येताच रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या घरी गेले. तेव्हा अयानच्या घरी त्याच्या वडीलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या कलाकारांना रणबीर भेटताना दिसला. बॉलिवूडचे अनेक कलाकार अयान मुखर्जीच्या घरी आले होते. यात करण जौहर, जया बच्चन, सलीम खान अशा अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता.

संध्याकाळी देब मुखर्जी यांच्यावर विर्लपार्लेच्या पवन हंस स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रणबीर कपूर देब मुखर्जी यांच्या पार्थिवाला खांदा देताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, खूप दिवसांपासून देब मुखर्जी आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अचानक काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देब मुखर्जी करिअर

देब मुखर्जी हे उत्तम अभिनेता आहेत. त्यांनी 60 आणि 70च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांचे कराटे, बातों बातों में, मै तुलसी तेरे आंगन की, जो जीता वही सिकंदर अशा अनेक चित्रपटांत महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT