Adipurush Poster
Adipurush Poster  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Boycott Adipurush: ट्विटरवर सर्वाधिक 'आदिपुरुष' बॉयकॉट ट्रेंडमध्ये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये (Bollywood) बॉयकॉट ट्रॅंडवर (Boycott Trend) चांगलाच जोर वाढत आहे. नुकताच भूषण कुमार दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्या टीझरवर नेटकऱ्यांसह प्रेक्षकांनी चांगलेच टिकेची झोड उठवली आहे. चित्रपटात प्रभासची भूमिका असल्याने चित्रपटाची चर्चा जोरदार होती. पण चाहत्यांनी टीझर पाहताच त्याला सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंगसह (Trolling) मीम्सचा पाऊस पडत आहे.

रावणाच्या बिसराख गावातील गावकऱ्यांनी रावणाच्या लूकसोबत चित्रपटावर बंदी करण्याची मागणी केली आहे. पाहा बातमी...

सैफ अली खान चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. रावणाच्या भूमिकेत सैफला पाहता ट्रोलर्स 'रावण नसून औरंगजेब आहे' असे म्हणतात. 'आदिपुरुष' चित्रपटाला ट्विटरवरील #BoycottAdipurush हा ट्रेंड लाखोंहून अधिक युजर्स वापरत आहे. अनेकांनी 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर पाहताच भारतीय संस्कृतीचा अपमान केला असे मत आहे. चित्रपटात रामायणाचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे.

चित्रपटातील व्हिएफएक्स व अॅनिमेशन ट्रोलर्सच्या चांगलेच निशाण्यावर आहे. रामायणातील काही दृश्यांचा फोटो लावत 'नो बिगबजेट, नो 3D रिलीज, जस्ट सिंपलीसीटी' अशा आशयाचे फोटोही प्रदर्शित केले आहे. तसेच लक्ष्मण व रावणाच्या लूकवरुनही ट्रोल केले जात आहे.

चित्रपटात प्रभासने रामाची भूमिका साकारली आहे. सोबतच क्रिती सेननने सीतेची भूमिका साकारली असून ज्या भूमिकेवरुन, लूकवरुन सर्वाधिक रणकंदन होत आहे ती भूमिका म्हणजे रावणाची. रावणाचे पात्र सैफ अली खानने साकारले. तर लक्ष्मणाचे पात्र सनी सिंग साकारत आहे. पुढील वर्षी १२ जानेवारी रोजी IMAX आणि 3D मध्ये चाहते हा चित्रपट पाहू शकतील. पौराणिक शैलीत असलेला चित्रपट हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषेत चित्रपट पाहता येणार आहे. टी-सीरीजने चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण कुमारांचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT