Bigg Boss Season 4: बिग बॉसमधील 'हा' आवाज कुणाचा? जाणून घ्या

बिग बॉसच्या पहिल्या दोन्ही पर्वात व्हाईस आर्टिस्ट रत्नाकर तारदळकर यांचा स्पर्धकांना सुचना देण्यासाठी भारदस्त आवाज लाभला आहे.
New Bigg Boss Logo
New Bigg Boss LogoSaam Tv

मुंबई: बिग बॉस (Bigg Boss Reality Show) या रिॲलिटी शोची ख्याती फक्त हिंदीतच नाही तर मराठीतही खूप आहे. बिग बॉस हा शो वादग्रस्त असला तरी त्याचा टीआरपी जबरदस्त आहे. प्रत्येक सीजनची थीम नेहमीच वेगवेगळी असते, तशीच या सीजनची थीम 'ऑल इज वेल' अशी आहे. पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात भांडणाचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरात थीमप्रमाणे तरी काही आलबेल दिसत नाही.

New Bigg Boss Logo
Adipurush Teaser: आदिपुरूष ट्रोलर्सच्या निशाण्यावर; रावणाच्या गावातून होतोय विरोध

कोणाचेही भांडण सुरू असेल, कोणत्याही गेमची सुरुवात होणार असेल, सर्व खेळाडूंना एकत्र बोलवायचे असेल, कोणती सूचना द्यायची असेल. त्यावेळी आपल्याला एक आवाज येतो 'बिग बॉस आदेश देतात की'. या आवाजाने तब्बल तीन पर्व गाजवले असून आता चौथेही पर्व गाजवत आहे. तुम्हाला ही कधी तरी असा प्रश्न पडला असेल की, या आवजामागील चेहरा कोणाचा. हा भारदस्त आवाज कोणाचा आहे? असे अनेक प्रश्न पडले असतील. तर आम्ही आज तुम्हाला या आवाजामागील चेहरा कोणाचा हे सांगणार आहेत.

New Bigg Boss Logo
Bigg Boss Season 4: आज पहिले नॉमिनेशन; कोणता सदस्य होणार नॉमिनेट

हा आवाज आहे व्हाईस आर्टिस्ट रत्नाकर तारदळकर यांचा. पहिल्या दोन्ही पर्वात त्यांचा आवाज लाभला होता. रत्नाकर तारदळकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांचे पडद्यामागील असणारी कामं, तसेच पार पाडायला लागणारी जबाबदारी या सर्वांवर भाष्य केले होते. रत्नाकर तारदळकर यांनी मुलाखतीत सांगितले होते की, 'बिग बॉसच्या घरातील मुख्य माणूस, पहिला माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हा आदेश जरी हुकुमी वाटत असला तरीही त्यात आदर आहे. त्यामुळे तो आवाज ही हुकुमी असावा यासाठी विशेष लक्ष आणि जबाबदारी असते.'

New Bigg Boss Logo
Swara Bhaskar: स्वरा भास्करचं राहुल गांधींसाठी खास ट्विट, पावसात भिजलेल्या राहुल गांधींचे केले कौतुक; म्हणाली...

'विशेष म्हणजे घरात २४ तास लक्ष घालावे लागते. सकाळी १० वाजेपासून स्पर्धकांना टास्क देण्यापासून दिवसाची सुरूवात होते. टास्क देण्याची जरी वेळ ठरली असली तरी टास्क संपण्याची वेळ नसते. बऱ्याचदा सकाळी सुरू झालेला टास्क दुसऱ्या दिवशी पहाटे टास्क संपतो. अनेकदा स्पर्धक खेळताना त्यांच्यात वादाचे खटके ही उडतात. त्यामुळे रत्नाकर यांना सेटवर रहावे लागते. सोबतच सेटवर असताना कोणाचाच मोबाईलही उचलू शकत नाही.'

'बिग बॉस मधील या आवजासाठी ऑडिशन घेण्यात आली होती. या आवाजमागील खरा चेहरा कोण हे बऱ्याचदा मला लपवणे खूप कठीण जाते. बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी काही जर मी बोललो तर लोकं म्हणायचे की, हा आवाज काहीसा ओळखीचा आहे. या रिॲलिटी शोची खासियत खूप वेगळी आहे. इथे खेळासोबत मानसिकता जपणे मोठे कार्य आहे. स्पर्धकांना आदेश देण्यासोबतच त्यांच्यासोबत संवादही साधायचा असतो.'

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com