Welcome To The Jungle Saam Tv
मनोरंजन बातम्या

Welcome To The Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची दमदार सुरुवात! अक्षय कुमारच्या मल्टीस्टाररने पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Welcome To The Jungle: अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. भारतासह जगभरातील कलेक्शन, स्टारकास्ट आणि वीकेंडच्या अपेक्षांविषयी जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

Welcome To The Jungle: अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपट 'वेलकम टू द जंगल' अखेर २६ जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. 'वेलकम' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करत निर्मात्यांना खूश केलं आहे.

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'वेलकम टू द जंगल'ने पहिल्याच दिवशी भारतात १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पेड प्रिव्ह्यूमधून चित्रपटाने ३.७५ कोटी रुपये मिळवले होते. त्यामुळे पहिल्या दिवसाचे नेट इंडिया कलेक्शन १८.७५ कोटी रुपये, तर ग्रॉस इंडिया कलेक्शन २२.५० कोटी रुपये इतके झाले आहे. देशभरात चित्रपटाचे सुमारे १०,८९२ शो प्रदर्शित करण्यात आले होते.

केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी ओव्हरसीज मार्केटमधून ६.५० कोटी रुपयांची कमाई झाली असून, चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन २९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ही सुरुवात समाधानकारक असून, शनिवार आणि रविवारी कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे त्याची तगडी स्टारकास्ट. अक्षय कुमारसोबत दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, रवीना टंडन, संजय दत्त, अनिल कपूर, सुनील शेट्टी, मानुषी छिल्लर, अरशद वारसी, तुषार कपूर, परेश रावल, जॉनी लिव्हर, राजपाल यादव यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. जवळपास ४० कलाकारांचा सहभाग असलेला हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या मल्टीस्टारर चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

Maharashtra News Live Update: पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

SCROLL FOR NEXT