Coolie vs War 2 Box Office Report Saam Tv
मनोरंजन बातम्या

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Coolie vs War 2 Box Office Report: आजकाल बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे. यामध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी दोन मोठ्या चित्रपटांचाही समावेश आहे.

Shruti Vilas Kadam

Coolie vs War 2 Box Office Report: आजकाल बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे. यामध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी दोन मोठ्या चित्रपटांचाही समावेश आहे. पहिला रजनीकांतचा 'कुली' आणि दुसरा हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआरचा 'वॉर २' हा चित्रपट. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. 'कुली'ने पहिल्याच दिवशी 'जैलर'चा विक्रमही मोडला. आता शनिवारी चित्रपटांनी किती कमाई केली ते जाणून घेऊयात.

कुली

साउथ सुपरस्टार रजनीकांत यांचा मल्टीस्टारर चित्रपट 'कुली' प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. पहिल्या दिवशी ६५ कोटी रुपयांनी सुरुवात झालेल्या या चित्रपटाने शनिवारी ३८.६ कोटी रुपये कमावले, तर शुक्रवारी ५४.७५ कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे, 'कुली'ने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर १५८.७ कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्ये रजनीकांत व्यतिरिक्त, नागार्जुन, उपेंद्र आणि आमिर खान देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

वॉर २

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर २' चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट 'कुली'ला टक्कर देत आहे. शुक्रवारी कमाईच्या बाबतीत 'वॉर २' 'कुली' पेक्षा पुढे होता, परंतु शनिवारी तो मागे पडला. 'वॉर २' ने शनिवारी ३३.२५ कोटी रुपये कमावले, तर शुक्रवारी ५७.३५ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने तीन दिवसांत एकूण १४२.७१ कोटी रुपये कमावले आहेत.

महावतार नरसिंह

अश्विन कुमार दिग्दर्शित 'महावतार नरसिंह' ने भारतातील बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी या चित्रपटाने ६.७५ कोटी रुपये कमावले, तर शुक्रवारी ७.२५ कोटी रुपये कमावले. 'महावतार नरसिंह' ने २३ दिवसांत एकूण २०२.३५ कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट भगवान विष्णूचा अवतार भगवान नरसिंहाची कहाणी दाखवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण, १७४ अर्ज बाद, तर २ हजार ७०३ अर्ज वैद्य

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे ११,४०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात

Mumbai : न्यू इयरच्या पार्टीसाठी घरी बोलावलं, लग्नाला नकार दिल्याने वाद; गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला

Stomach pain causes: वारंवार पोटदुखी होतेय तर दुर्लक्ष करू नका; हे गंभीर आजार करतायत तुमच्या शरीरात घर

SCROLL FOR NEXT