Box Office Collection Report Saam Tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: गणरायाच्या आगमनाचा 'कुली' झाला फायदा; जाणून घ्या 'वॉर २' आणि 'महावतार नरसिंह'ची कमाई

Box Office Collection Report: 'कुली' आणि 'वॉर २' चित्रपटगृहांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीत, 'महावतार नरसिंह' उत्तम कलेक्शन केले आहे. आता जाणून घेऊया बुधवारी या चित्रपटांची किती कमाई केली.

Shruti Vilas Kadam

Box Office Collection Report: सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तीन चित्रपट उत्तम कमाई करत आहेत. एकीकडे 'कुली' आणि 'वॉर २' हे दोन मोठे चित्रपट चांगली कमाई करत आहेत. तर, दुसरीकडे, 'महावतार नरसिंह' गेल्या ३४ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अजूनही सुरू आहे. आता जाणून घेऊयात बुधवारी कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली.

कुली

रजनीकांतच्या ५०वा प्रदर्शित झालेला 'कुली' हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. बुधवारी १४ व्या दिवशी या चित्रपटाने ५.५६ कोटी रुपये कमावले. तर मंगळवारी चित्रपटाचे कलेक्शन फक्त ३.६५ कोटी रुपये होते. 'कुली'ला गणेश चतुर्थीच्या सुट्टीचा फायदा झाला असून १४ दिवसांत 'कुली'चे एकूण कलेक्शन २६९.८१ कोटी रुपये झाले आहे.

वॉर २

दुसरीकडे, 'कुली' सोबत प्रदर्शित झालेला हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी झाला आहे, परंतु चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारी २.७५ कोटी रुपये कमाई करणाऱ्या 'वॉर २'ने बुधवारी फक्त २.५० कोटी रुपये कमाई केली. तर, १४ दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई २२९.७५ कोटी रुपये झाली आहे.

महावतार नरसिंह

'वॉर २' आणि 'कुली' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये, 'महावतार नरसिंह' ३४ दिवसांनंतरही उत्तम कामगिरी करत आहे. बुधवारी, चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. मंगळवारी १.७५ कोटी रुपये कमाई करणाऱ्या 'महावतार नरसिंह'ने बुधवारी म्हणजे ३४ व्या दिवशी २.२५ कोटी रुपये कमाई केली आहे. अशाप्रकारे, 'महावतार नरसिंह'ची ३४ दिवसांत एकूण कमाई २३७.१० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT