Sara Tendulkar-Shubhman Gill Saam TV
मनोरंजन बातम्या

सारा तेंडुलकर-शुभमन गिलचं ब्रेकअप? त्यांच्या एका कृतीमुळे चर्चांना उधाण

...त्यानंतर सारा तेंडुलकर शुभमन गिलचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Jagdish Patil

मुंबई: सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा आणि भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच ते दोघे आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. सारा आणि गिल यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर (Instagram) अनफॉलो केल्यामुळे या दोघांचे ब्रेकअप झालं की काय असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

भारताने झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली होती. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) याने शतक झळकावले होते. त्यानंतर गिल प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर सचिनची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिच्यासोबत गिलचं अफेअर असल्याचे किस्से सुरु झाले होते.

या दोघांची ओळख २०१९ च्या आईपीएलच्या सामन्यावेळी झाली होती. तेंव्हापासून या दोघांबाबतच्या चर्चा सोशल मिडियावरती सुरु होत्या. त्याबाबतच्या बातम्या जरी प्रसारीत झाल्या असल्या तरी या गोष्टीबाबत शुभमन आणि साराने कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.

दरम्यान, हे दोघे एकमेकांच्या इंस्टाग्राम पोस्टवरती (Instagram) कॉमेंट करायचे. मात्र, आता त्यांच्या एका कृतीमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. सारा आणि शुभमनचे इंस्टाग्राम अकाउंटवर एकमेकांना अनफॉलो केल्याचं दिसत आहे. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

गिलने मोडला सचिनचा रेकॉर्ड -

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गिलने शानदार शतक झळकावले होते या सामन्यात त्याने 97 चेंडूत 130 धावांची शानदार खेळी खेळली. यावेळी त्याने 15 चौकार आणि एक षटकार मारला. हे शतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

Jalna Rain : पावसाचा कहर; जालन्यात अतिवृष्टीत ९३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT