Border 2 Box Office Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Border 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'बॉर्डर 2' ची हवा; दोन दिवसांत 50 कोटी पार, वाचा कलेक्शन

Border 2 Box Office Collection Day 2 : सनी देओलचा 'बॉर्डर 2' रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन किती, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे.

'बॉर्डर 2' ॲक्शन, युद्ध, देशभक्तिपर चित्रपट आहे.

'बॉर्डर 2' मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

'धुरंधर'नंतर सर्वत्र 'बॉर्डर 2' ची चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर गर्दी करत आहेत. 'बॉर्डर 2'मध्ये तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. 'बॉर्डर 2' चित्रपट 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज करण्यात आला आहे. सनी देओल 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशा बक्कळ कमाई केली. आता चित्रपट वीकेंडला किती कमावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार,'बॉर्डर 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शनिवारी म्हणजेच रिलीजच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 35 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाने दोन दिवसांत तब्बल 65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता 'बॉर्डर 2' चित्रपट रविवार, सोमवारी किती कमाई करतो, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'बॉर्डर 2' स्टारकास्ट

'बॉर्डर 2' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह हे आहेत. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, परमवीर सिंह चीमा, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंग झळकले आहेत. 'बॉर्डर 2' हा 1997 ला रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे. जवळपास 26 वर्षांनंतर 'बॉर्डर २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटातील गाणी लोकांना खूपच आवडत आहे.

'बॉर्डर 2' कथा

'बॉर्डर 2' चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त ऑपरेशन्सचे चित्रण केले आहे. हा चित्रपट भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करतो आणि अनेक सत्य घटनांवर आधारित आहे, ज्यामध्ये वरुण धवन मेजर होशियार सिंह यांच्या भूमिकेत आहे, ज्यांना परमवीर चक्र मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

Maharashtra Live News Update: कणकवली-नरडवे रोडवर कारला आग लागून कार जळून खाक

आमदारकी अन् मंत्रिपदासाठी खरातच्या दरबारी खेट्या, 8 वर्षांपासून संपर्क; चाकणकरांनंतर शिवसेनेच्या महिला नेत्या अडचणीत

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्टवरुन ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट; नवीन वेळापत्रक जारी

SCROLL FOR NEXT