Boney Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Boney Kapoor : बोनी कपूर यांचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; २६ किलो वजन घटवलं, फिटनेस फंडा काय?

Boney Kapoor Lose Weight : बोनी कपूर यांनी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. त्यांनी 26 किलो वजन कमी केले आहे. त्यांचे सीक्रेट डाएट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉलिवूड कलाकारांचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क होत आहे. करण जोहर, राम कपूर, कपिल शर्मा यांच्यानंतर अजून एका बॉलिवूडच्या सुपरस्टारने आपले ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. आपले वजन कमी करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. हा सुपरस्टार दुसरा-तिसरा कोणी नसून चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) आहेत.

बोनी कपूर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांनी आपल्या हटके फोटोंनी चाहत्यांनी वेडे केले आहे. अलिकडेच बोनी कपूर यांनी इन्स्टाग्रामवर छान कॅज्युअल आणि सेमी फॉर्मल पोशाखात फोटो शेअर केले. ज्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. बोनी कपूर यांनी चक्क 26 किलो वजन कमी केले आहे.

सीक्रेट डाएट काय?

बोनी कपूर हे त्यांच्या फिटनेसमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या आकर्षक लूकचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. बोनी कपूर हे रात्रीचे जेवण वगळता फक्त सूप पितात. तसेच नाश्त्यात फळे, ज्यूस आणि ज्वारीची रोटी खातात. त्यांनी जिम शिवाय 26 किलो वजन कमी केले आहे. पौष्टिक आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या मदतीने त्यांनी वजन कमी केले आहे.

बोनी कपूर यांनी वयाच्या 69 व्या वर्षी 26 किलो वजन कमी केले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बोनी कपूर यांनी फक्त वजन कमी केले नसून हेअर ट्रान्सप्लांट देखील केले आहे. ज्यामुळे त्यांचा लकू खूपच भारी दिसत आहे. त्यांच्या या हटके ट्रान्सफॉर्मेशनचे श्रेय त्यांनी पत्नी श्रीदेवी यांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! या बँकेचे लायसन्स केले रद्द; तुमचं खाते नाही ना?

Guruwar che Upay: गुरुवारच्या दिवशी करा 'हे' ५ उपाय; घरात येईल धन-समृद्धी

Mumbai : मुंबईकरांनो सावधान ! 26 जुलैला समुद्रात उसळणार मोठ्या लाटा | VIDEO

आपटून आपटून कुणाला मारणार? महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दुबेंना विचारला जाब, संसदेत राडा

SCROLL FOR NEXT