Behind-the-scenes story of Heeramandi Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Heeramandi Web Series: ‘हिरामंडी’च्या शुटिंगला किती दिवस लागले? तयार व्हायला कोण वेळ घ्यायचं? टीमने सांगितली पडद्यामागची गोष्ट

Sanjay Leele Bhansali's Heeramandi Web Series : ‘हिरामंडी: द डायमंड बाझार’ वेबसीरीजच्या शुटिंगला किती दिवस लागले ?, शुटिंगसाठी स्टारकास्टला तयार व्हायला किती वेळ लागायचा ?, याबद्दल वेबसीरिजच्या टीमने सांगितले आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा लवकरच आगामी आणि भव्य दिव्य प्रोजेक्ट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘हिरामंडी: द डायमंड बाझार’ ही वेबसीरीज येत्या १ मे ला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटीवर रिलीज होणार आहे. सध्या ह्या वेबसीरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकतंच या वेबसीरीजची स्पेशल स्क्रिनिंग पार पडली, यावेळी अवघं बॉलिवूड स्क्रिनिंगसाठी उपस्थित होते. नुकतंच या वेबसीरीजमधील स्टारकास्टने ‘इंडिया टुडे’ या वेबसाईटला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये, त्यांनी वेबसीरीजच्या शुटिंगला किती दिवस लागले ?, शुटिंगसाठी तयार व्हायला किती वेळ लागायचा ?, याबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.

सध्या या वेबसीरीजची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच वेबसीरीजच्या स्टारकास्टने ‘इंडिया टुडे’सोबत साधला. टीमने मुलाखतीत सांगितले की, “ ‘हिरामंडी: द डायमंड बाझार’ वेबसीरीजची शूटिंग पूर्ण करण्यासाठी ३८० दिवस लागले. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख, शर्मीन सहगल आणि रिचा चड्ढा या पाच अभिनेत्रींना दररोज तयार होण्यासाठी किमान २-३ तास ​​लागायचे. तर आदिती राव हैदरी खूप लवकर तयार व्हायची. वेब सीरिजमध्ये अदिती हैदरी हिने बिब्बो जानचे पात्र साकारले. कोणतीही अशक्य गोष्ट सहज संजय लीला भन्साळी शक्य करतात.”

संजय लीला भन्साळी ‘हिरामंडी: द डायमंड बाझार’ या वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटी क्षेत्रात डेब्यू केले आहे. ही वेबसीरीज एकूण ८ एपिसोड्सची आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनावर आधारित वेबसीरीजच्या शूटिंगला तब्बल ३८० दिवस लागल्याचे म्हटले जात आहे. वेबसीरीजचा ट्रेलर आणि वेबसीरीजमधील गाणीही रिलीज झालेली आहेत. यांमधील भव्य-दिव्य सेट्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. वेबसीरीजचा सेट तयार करण्यासाठी तब्बल सलग सात महिने लागले. सलग सात महिने, ७०० कारागिरांनी मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये सुमारे ६०,००० लाकडी फळ्या आणि धातूच्या फ्रेम्सवर सेट उभारला आहे. १५ एकरावर संपूर्ण सेट उभारला असून तो एका संग्रहालयासारखेच दिसत आहे.

'हीरामंडी'ची स्टारकास्टही बरीच मोठी आहे. या सीरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा प्रमुख भूमिकेत आहे.. नेटफ्लिक्सवरील ही अत्यंत महागड्या वेबसीरिजपैकी एक वेबसीरीज असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT